15 December 2017

News Flash

Ind vs Aus: ये बस पुजारा! ६६८ मिनिटं खेळायला गेला होतास ना?

ट्विटर जोक्सच्या विश्वात आता चेतेश्वर पुजारालाही मानाचं स्थान

लोकसत्ता आॅनलाईन | Updated: March 20, 2017 10:06 AM

चेतेश्वर पुजारा ( संग्रहीत छायाचित्र )

चेतेश्वर पुजाराच्या मॅरेथाॅन बॅटिंग सेशननंतर भारताची तिसऱ्या टेस्टवरची पकड घट्ट झाली. आणि पुजाराने विक्रमांच्या पुस्तकात स्थान मिळवले. एकाच टेस्टमॅचमध्ये ५०० बाॅल्स खेळणारा पुजारा पहिला भारतीय ठरला आहे. याआधीचा विक्रम ‘द वाॅल’ राहुल द्रवीडच्या नावावर होता. त्याने याआधी ४९५ बाॅल्स खेळत टेस्ट मॅचमध्ये पिचवर तंबू ठोकला होता.

तब्बल ६६८ मिनिटं खेळून काढलेल्या पुजाराच्या बॅटिंगबद्दल काही जोक्स ट्विटववर फिरत होते. अर्थात यात त्याच्याविषयी कौतुकाचाच स्वर होता. पाहुयात अशी काही ट्वीट्स

चित्र- १ : पुजारा बॅटिंगला आल्यावर
चित्र- २ : पुजाराची बॅटिंग संपल्यावर

२. पुजाराची बॅटिंग सुरू झाली तेव्हा योगी आदित्यनाथ एक सामान्या खासदार होता. त्याची बॅटिंग संपेपर्यंत तो मुख्यमंत्री झाला होता.

३. पुजाराची बॅटिंग बघायची तर बाबा जय्यत तयारी हवी

४. स्टीव्ह स्मिथपण म्हातारा झाला

५. कधी येशील तू?

रवींद्र जडेजा, आशिष नेहरा, विराट कोहलीनंतर ट्वीट्सच्या राज्यात चेतेश्वर पुजाराचं स्थानही पक्कं झालं आहे म्हणायचं!

First Published on March 20, 2017 10:06 am

Web Title: ind vs aus twitter jokes appreciating marathon batting session of cheteshwar pujara