28 October 2020

News Flash

Viral Video: पँटचा गोंधळ झाला अन् रोहित खदखदून हसला

डिकॉकची ७८ धावांची दमदार खेळी

आयपीएलचा १३ वा हंगाम आता ऐन रंगात आला आहे. प्रत्येक संघाचे सात पेक्षा जास्त सामने झाले आहेत. आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या उत्तराअर्धाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुंबईने कोलकाता संघाचा ८ विकेटने दारुण पराभव केला. या सामन्यात डिकॉकने धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. सामन्याचा हिरो ठरलेल्या डिकॉकच्या पँटचा गोंधळ झाला अन् रोहित सामन्यादरम्यानच खदखदून हसला. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

कोलकाता संघानं प्रथम फलंदाजी करताना १४८ धावांपर्यंत मजल मारली होती. कोलकातानं दिलेल्या आवाहानाचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि डिकॉक मैदानावर उतरले. पण यावेळी प्रॅक्टिसची पँट घालून आल्याचं डिकॉकच्या लक्षात आलं. त्याचंवेळी ही गोष्ट रोहितच्याही लक्षात आली. रोहितला आपलं हसू अनावर झालं अन् तो खदखदून हसू लगला. डिकॉक पँट बदलण्यासाठी ड्रेसिंग रुममध्ये माघारी जात होता. तेवढ्यात रोहितने त्याला थांबवलं. डिकॉकने प्रॅक्टिसमधील पँट घालून ४४ चेंडूत दमदार ७८ धावांची खेळी केली.

डिकॉकच्या दमदार फलंदाजीच्या बळावर मुंबईनं कोलकाता संघाचा ८ विकेटने पराभव केला. धडाकेबाज अर्धशतक झळकावणाऱ्या डिकॉकला सामनाविराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 3:01 pm

Web Title: ipl 2020 mi s quinton de kock comes out to bat in training pant rohit sharma in splits nck 90
टॅग IPL 2020
Next Stories
1 Video : चहलची होणारी बायको धनश्री म्हणते…परी हु मै !
2 महिलांच्या बँक खात्यांवर केंद्र सरकार जमा करतंय दोन लाख २० हजार रुपये?; जाणून घ्या नक्की काय आहे हा प्रकार
3 अल्बर्ट आइनस्टाइनसोबत असणारी ही मराठमोळी व्यक्ती कोण ओळखलंत का?
Just Now!
X