IPL 2020ला काहीच दिवस शिल्लक असून स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण गेले दोन आठवडे चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खूपच वेदनादायी गेले. CSKच्या एकूण ताफ्यातील १२ सहाय्यक कर्मचारी आणि २ खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे चेन्नई संघाचे २८ ऑगस्टपासून सुरू होणारे प्रशिक्षण शिबीर लांबणीवर पडले होते. दीपक चहर आणि ऋतुराज गायकवाड या दोन क्रिकेटपटूंनाही करोना झाला होता, पण दीपक चहरने करोनावर मात केली आणि अखेर तो CSKच्या सराव सत्रात सहभागी झाला.
दीपक चहरने पोस्ट केलेला फोटो पोस्ट करत IPLची ‘मिस्ट्री गर्ल’ आणि त्याची बहिण मालती हिने त्याला एक खास संदेश दिला. तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दीपक चहरचा फोटो पोस्ट करत सिंह पुन्हा गर्जनेसाठी तयार आहे असं कॅप्शन दिलं. या कॅप्शनसोबतच तिने दीपक चहर आणि IPL 2020 हे हॅशटॅगही वापरले.
The lion is ready to roar @deepak_chahar9 #IPL2020 pic.twitter.com/3xGLh7ZWEW
— Malti Chahar
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 10, 2020 5:51 pm
Web Title: ipl malti chahar tweet csk cricketer deepak chahar covid 19 vjb 91