News Flash

अविस्मरणीय… चंद्र प्रकाशातील इंद्रधनुष्य ठरतंय चर्चेचा विषय; जाणून घ्या कुठून दिसलं दृष्य

चंद्राच्या प्रकाशातील हे इंद्रधनुष्य टीपणारा फोटोग्राफर काय म्हणतोय जाणून घ्या

(फोटो सौजन्य : instagram/albertoghizzipanizza वरुन साभार)

आपल्यापैकी अनेकांनी आतापर्यंत इंद्रधनुष्य पहिलं असेल. प्रकाशाच्या किरणाचं विकेंद्रीकरण होऊन तांबडा, नािरगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा असे सात रंग पाहायला मिळतात ज्याला आपण इंद्रधनुष्य असं म्हणतो. अनेकदा ऊन-पावसाचा लपंडाव सुरु असतानाच आकाशात इंद्रधनुष्य दिसतं. मात्र तुम्ही कधी चंद्राभोवती इंद्रधनुष्य पाहिलं आहे का?, प्रश्न थोडा चमत्कारिक वाटेल पण चंद्रभावतीच्या इंद्रधनुष्याचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरतोय.

नक्की वाचा >> एलियन्स आहेत का? “होय! कदाचित पृथ्वीवरच आहेत; फक्त…”

इटलीमधील फोटोग्राफर अल्ब्रेटो पानिझ्झा याने आपल्या कॅमेरामध्ये चंद्राभोवतीच्या इंद्रधनुष्याचा हा फोटो टीपला आहे. त्याने हा फोटो पारमा शहराजवळ असताना काढला आहे. चंद्राभोवतीचं हे इंद्रधनुष्य हवेतील पाण्याच्या सूक्ष्म कणांमुळे निर्माण झालं आहे. प्रकाशाच्या किरणांचं विकेंद्रीकरण होऊन त्यामधून हे सात रंगाचं इंद्रधनुष्य तयार झालं. या अशाप्रकारच्या घटनेला लुना कॉर्ना असं म्हणतात. चंद्राचा प्रकाश हवेतील पाण्याच्या अंशामुळे किंवा बर्फाच्या क्रिस्टलमुळे विकेंद्रीत होतो आणि सात रंगांचं इंद्रधनुष्य तयार होतं.

पानिझ्झा याने यापूर्वीही आपण असं इंद्रधनुष्य अनेकदा पाहिलं असल्याचं सांगितलं आहे. मी अनेकदा असं इंद्रधनुष्य पाहिलं आहे. मात्र ते कधी कॅमेराच्या माध्यमातून मला यापूर्वी कैद करता आलं नाही, असं पानिझ्झा सांगतो. करोना लॉकडाउनचे निर्बंध लागू करण्यात आल्याने सध्या पानिझ्झा घरीच असल्याने त्याने अशाप्रकारेच इंद्रधनुष्य दिसल्यास त्याचा फोटो काढायचा असं ठरवलं होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खरोखरच पानिझ्झाला हे असं इंद्रधनुष्य घरातून दिसलं. त्याने आधीच कॅमेरापासून इतर आवश्यक गोष्टीची तयारी करुन ठेवल्याने त्याला हे इंद्रधनुष्य कॅमेरात कैद करता आलं.

नक्की वाचा >> खगोलशास्त्रज्ञ म्हणतात, “आपल्याच आकाशगंगेत एलियन्सच्या ३० वसाहती असण्याची शक्यता”

पानिझ्झा जवळजवळ दोन तास या इंद्रधनुष्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. ढगाळ वातारवण आणि चंद्राचा त्यामध्ये चालेला लपंडाव यामुळे थोड्या अडचणी नक्कीच आल्या. मात्र मी रात्री दहा ते १२ दरम्यान सतत थोड्या थोड्या वेळाने चंद्राचे काही शे फोटो काढले. पानिझ्झाने काढलेला फोटो खरोखरोच फार सुंदर असून यामध्ये चंद्राभोवती पूर्ण गोलाकृती इंद्रधनुष्य दिसत आहेत. तसेच आकाशामधील इतर तारेही या फोटोत दिसत आहेत.

सोशल मिडियावर हा फोटो व्हायरल झाला असून अनेकांनी इतका भन्नाट फोटो काढणाऱ्या पानिझ्झाचं कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2021 11:50 am

Web Title: italian photographer captures a rare phenomenon of a moon with rainbow ring around it scsg 91
Next Stories
1 या फोटोत किती बदकं आहेत?; हजारो जणांनी केलाय उत्तर देण्याचा प्रयत्न तुम्हाला जमतंय का बघा
2 बापरे…! ११ वर्षांचा मुलगा YouTube वर व्हिडिओ बघून शिकला हॅकिंग, नंतर वडिलांनाच अश्लील फोटो…
3 5 वर्षांचा चिमुकला वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट चालवतोय Land Cruiser, व्हायरल व्हिडिओ बघून नेटकरी हैराण
Just Now!
X