गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी यांनी शेअर केलेले ‘फोटोशॉप्ड्’ छायाचित्र त्यांच्या अंगलट आले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आध्यात्मिक गुरू श्री श्री रवि शंकर यांच्यासह ‘स्वराज्य’च्या स्तंभलेखिका शेफाली वैद्य छायाचित्रात दिसत आहेत. मात्र शेफाली यांचे छायाचित्र त्यांच्या फेसबुक पेजवरून घेण्यात आले. त्यानंतर ते आदित्यनाथ आणि रविशंकर यांच्यासोबत जोडण्यात आले. खरे तर अभिनेता अक्षयकुमार आणि परेश रावल यांच्या भूमिका असलेल्या ‘ओ माय गॉड’ या चित्रपटातील एका दृश्याचा आधार घेऊन ‘फोटोशॉप्ड्’ बनविण्यात आले आहे. यातील योगी आणि रविशंकर यांचे छायाचित्र खरे आहे. मात्र त्यांच्यासोबत जोडलेले शेफाली यांचे छायाचित्र हे फोटोशॉप्ड् आहे. कारण छायाचित्रात एकच व्यक्ती दोन ठिकाणी दिसत आहे. बनावट छायाचित्र असतानाही आमदारपद भूषविणाऱ्या मेवानी यांनी त्याची कोणतीही शहानिशा न करता ते ‘शेअर’ केले. मेवानी यांच्या या खोडसाळपणावर शेफाली वैद्य यांनी जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर ‘ट्विटर’वर मेवानी यांच्यावर जोरदार हल्ला चढविण्यात आला. त्यानंतर मेवानी यांनी ट्वीट मागे घेतले.