कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे एका कन्नड गीतावर बेभान होऊन नाचत असल्याची एक ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारीत झाली. परंतु त्या ध्वनिचित्रफितीत नाचणारे ते मुख्यमंत्री नाहीत. नृत्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव चन्नमागौडा आहे. चन्नमगौडा हे म्हैसूरमधील शेतकरी आहेत. चन्नमगौडा हे अगदी हुबेहूब सिद्धरामय्या यांचे सारखेच दिसतात.  भाजप समर्थक अनंतकुमार हेगडे याने हा ‘व्हिडीओ’ सिद्धरामय्या यांचे नाव  घुसडून फेसबुकवर प्रसारित केला होता;  सिद्धरामय्यांचा ‘डान्स’ पाहण्यासाठी अनेकांनी ‘गुगल सर्च’ करूनही पाहिले तेव्हा ते नृत्य शेतकरी चन्नमगौडा यांचे असल्याचे स्पष्ट झाले!!