09 July 2020

News Flash

राहुलने पोस्ट केला कॉफी पितानाचा फोटो, चाहते म्हणाले…

पाहा चाहत्यांनी पोस्ट केलेल भन्नाट मीम्स

करोनाच्या भीतीमुळे गेले तीन-चार महिने बंद असलेले क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ८ जुलैपासून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात कसोटी क्रिकेटची सुरूवात होणार आहे. पाकिस्तानचा क्रिकेट संघदेखील रविवारी इंग्लंडला तीन सामन्यांच्या कसोटी आणि तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी रवाना झाला. पण भारतीय क्रिकेट संघाला आणि चाहत्यांना मात्र अजून वाट पाहावी लागणार आहे. कारण BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याने टीम इंडियाचे प्रशिक्षण शिबीर ऑगस्ट महिन्याच्या आधी सुरू होणार नसल्याचे सांगितले. या वृत्तानंतर चाहतेही नाराज झाले. त्यामुळे खेळाडूंना आणखी काही दिवस घरात बसून राहावे लागणार आहे. या दरम्यान सलामीवीर लोकेश राहुलने एक फोटो पोस्ट केला आणि त्यावरून तो ट्रोल झाला.

लोकेश राहुलने घरात बसून कॉफी पितानाचा फोटो पोस्ट केला. या फोटोला त्याने केवळ कॉफी इतकेच कॅप्शन दिले. त्या फोटोवरून चाहत्यांनी त्याला त्याच्या आयुष्यातील कॉफी विथ करण शो बद्दलची आठवण करून दिली. त्या शो मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या हार्दिक पांड्यासोबत राहुलही असल्याने त्याला काही काळ क्रिकेटबंदीचा सामना करावा लागला होता. त्याचीच आठवण चाहत्यांना त्याला करून दिली आणि कॉफीपासून दूरच राहा, असा सल्ला दिला.

दरम्यान, त्या शो मधील प्रकारानंतर हार्दिक आणि राहुल एकमेकांशी बराच काळ बोलले नव्हते. हार्दिकनेच याबाबत माहिती दिली. “त्या प्रकरणानंतर माझ्यासाठी जे झालं, ते घडून गेलं. मला निलंबनाच्या शिक्षेनंतर थेट टीम इंडियात संधी मिळाली. राहुलला मात्र भारत अ संघाकडून खेळावं लागलं. पण त्यामुळे आमच्या मैत्रीत अजिबात अंतर पडलं नाही. घडलेल्या प्रकरणानंतर आम्ही एकमेकांशी महिनाभर एक शब्दही बोललो नाही. महिनाभर आम्ही एकमेकांपासून ‘ब्रेक’ घेतला. नंतर फक्त राहुल त्या प्रकरणानंतर आधीपेक्षा खूप शांत स्वभावाचा झाला. पण आमचं एकमेकांवरचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाही”, असं हार्दीकने स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 10:02 am

Web Title: kl rahul shares picture drinking coffee fans come up with hilarious memes vjb 91
Next Stories
1 भारत सरकारने बंदी घातलेल्या ५९ चिनी अ‍ॅपमध्ये पबजी आहे का?
2 ‘या’ चिमुकल्याचा डान्स पाहिलात का?; ‘डान्सिंग अंकल’नंतर सोशल मीडियावर हिट ठरलाय हा गोविंदाचा चाहता
3 सरन्यायाधीशांचा Harley Davidson वरील फोटो व्हायरल, प्रशांत भूषण यांनी केली टीका
Just Now!
X