24 January 2021

News Flash

Viral Video : समुद्रकिनारी तरुणीला प्रपोज करायला जात होता ‘तो’, अचानक पाय घसरला अन्…

लग्नासाठी प्रपोज करायला जात असताना अचानक पाय घसरला अन्

सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण समुद्रकिनारी उभ्या असलेल्या त्याच्या मैत्रिणीला ‘प्रपोज’ करायला जाताना दिसतोय. पण, प्रपोज करण्याच्या काही क्षण आधीच त्याचा पाय घसरतो आणि तो जोरात खाली पडतो.

अमेरिकेच्या एका समुद्र किनाऱ्यावरील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये लोगान जॅक्सन नावाचा व्यक्ती त्याची मैत्रिण मारिया गुग्लिओटा हिला लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी जाताना दिसत आहे. मारिया समुद्रकिनारी तिच्या कुत्र्यासोबत फिरत असल्याचं व्हिडिओत दिसतंय. जॅक्सन मारियाला प्रपोज करणार इतक्यात त्याचा पाय घसरतो आणि तो जोरात खाली आपटताना या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्याला पडलेलं पाहून मारियालाही हसू आवरणं कठीण होतं. नंतर जॅक्सन पटकन गुडघ्यावर बसून तिला अंगठी देत प्रपोज करतो. मारियानेच हा व्हिडिओ गेल्या शनिवारी फेसबुकवर शेअर केला आहे.

नेटकऱ्यांमध्ये हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून आतापर्यंत 6 हजाराहून अधिक जणांनी तो बघितला आहे. तर 300 पेक्षा जास्त रिएक्शन्स आणि 200 पेक्षा जास्त कमेंट्स यावर आल्या आहेत. इतक्या जोरात पडल्यानंतरही त्याने ज्याप्रकारे प्रपोज केलं ते शानदार होतं, असं काही युजर्स म्हणतायेत. तर, व्हिडिओ बघून अजूनही हसू आवरता येत नाहीये, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

१७ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2020 3:04 pm

Web Title: man slips on beach seconds before proposing to girlfriend viral video sas 89
Next Stories
1 डिलिव्हरी पॅकेजचा पत्ता, “मंदिराजवळ आल्यावर कॉल कर…”; फ्लिपकार्टनेही दिला भन्नाट रिप्लाय
2 कागदावरील ‘त्या’ तीन शब्दांमुळे अमृता फडणवीस झाल्या ट्रोल
3 छोरा गंगा किनारेवाला… PPE कीट घालून विकतो पान; बनारसमधील पानवाला ठरतोय चर्चेचा विषय
Just Now!
X