News Flash

आज दिवस आणि रात्र असतील समान

आजचा दिवस व रात्र दोन्ही प्रत्येकी १२ तासांचे असतील.

पृश्वीचा अक्ष २३.४५ अंशाने कलेलला असल्यामुळे सूर्योद्य व सूर्यास्ताची जागा दररोज थो़ड्या प्रमाणात बदलत जाते.

तुम्हाला माहित आहे का? आज दिवस आणि रात्र समान असतील. आज म्हणजेच २१ मार्च २०१९ पासून २१ जून २०१९ पर्यंत प्रत्येक दिवस मोठा होत जाईल. याचाच अर्थ आजचा दिवस व रात्र दोन्ही प्रत्येकी १२ तासांचे असतील.

पृश्वीचा अक्ष २३.४५ अंशाने कलेलला असल्यामुळे सूर्योद्य व सूर्यास्ताची जागा दररोज थो़ड्या प्रमाणात बदलत जाते. या प्रक्रियेला आपण ‘आयकॉनिक कर्व्ह’ असे म्हणतो. यामूळे सूर्य सहा महिने उत्तर धृवीय भागात व सहा महिने दक्षिण ध्रुवीय भागात असतो. या प्रकारामूळे सूर्य वर्षातून दोन वेळा पृथ्वीच्या विषववृत्ताच्या सम प्रमाणात येतो. अशा वेळेस दिवस व रात्र प्रत्येकी १२ तासांचे असतात. हा दिवस म्हणजे २१ मार्च होय. आजच्या दिवशी सूर्य पृथ्वीच्या उत्तर ध्रृवीय भागात प्रवेश करतो. त्यामुळे आज दिवस व रात्र सम प्रमाणात असतील.

२१ मार्च रोजी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास ‘वसंतसंपात’ असे म्हणतात. तर २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य ज्या बिंदूवर असतो त्यास ‘शरदसंपात’ असे म्हणतात. २१ जून या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर उत्तर भागात आलेला असतो. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. तर २२ डिसेंबर या दिवशी सूर्य जास्तीत जास्त वर दक्षिण भागात असतो. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. पृथ्वी स्वत: भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीही फिरते. त्यामुळेच दिवस व रात्र हे पहर ऋतु निर्माण झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 1:38 pm

Web Title: march 21 to have equal day and night
Next Stories
1 शांततेच्या नोबेलसाठी १६ वर्षीय मुलीचे नामांकन
2 विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लिहिलं PUBG गेम कसा खेळावा, शिक्षकही हैराण
3 जिद्दीला सलाम..! ८६ वर्षीय आजोबांनी चालवली ४ लाख किमी सायकल
Just Now!
X