स्पोर्ट्स अँकर आणि क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. आपल्या अँकरिंगने अनेकांना प्रभावित करणारी मयंती लँगर सोशल मीडियावर उलट सुलट प्रश्न विचारणा-यांनाही आपल्या उत्तराने अनेकदा क्लीन बोल्ड करते. अत्यंत बिनधास्त असणा-या मयंती लँगरचा चाहतावर्गही मोठा आहे. नुकतंच एका व्यक्तीने ट्विटरवर मयंतीकडे डिनर डेटवर घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. यावर मयंतीने दिलेलं उत्तर पाहून ट्विटरकर तिच्यावर फिदा झाले आहेत.

मयंती सध्या आयपीएलसाठी अँकरिंग करण्यात व्यस्त आहे. एका व्यक्तीने मयंतीला ट्विट करत लिहिलं की, ‘तुम्हाला पाहिल्यानंतर मला आयपीएल पाहिल्याचं दुख: होत नाही. तुम्ही व्यक्तीमत्व आणि क्लास या दोन्हीचं मिश्रण आहात. मला तुम्हाला डिनरसाठी घेऊन जाण्याची इच्छा आहे. तुम्ही किती सुंदर आहात हे मी सांगू शकत नाही’. मयंतीने या ट्विटरला उत्तर दिलं की, ‘धन्यवाद..मला आणि माझ्या पतीला तुमच्यासोबत येणं नक्की आवडेल’.