News Flash

एक्स गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी बनवलेल्या भुयारात अडकला प्रियकर

भुयारातून काढले त्यावेळी त्याची स्थिती फारच वाईट होती. त्याला डिहायड्रेशनची समस्या झोली होती.

(फोटो साभार - डेली मेल)

ब्रेकअपनंतरही गर्लफ्रेन्डवर लक्ष ठेवण्यासाठी तरूण काहीना काही रिकामे उद्योग करत असल्याच्या वेगवेगळ्या घटना नेहमीच वाचण्यात येतात. मात्र, एका व्यक्तीनं त्या सर्व सिमा पार केल्या आहेत. उत्तर मॅक्सिकोमधील एका ५० वर्षीय व्यक्तीनं एक्स गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी तिच्या घरापर्यंत चक्क भुयार खोदल्याचे समोर आले आहे. एक्स गर्लफ्रेंडवर नजर ठेवण्यासाठी खोदत असलेल्या भुयारात तो व्यक्ती अडकल्यामुळे हा प्रकार समोर आला. बचावकार्यानंतर त्या व्यक्तीला वाचवण्यात यश आले. दोघांमध्ये तब्बल १४ वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते. काही कारणास्तव दोघे वेगळे झाले होते. वेगळे झाल्यानंतरही त्या व्यक्तीनं प्रियसीचा पाठलाग सुरूच ठेवला होता.

एबीसीच्या वृत्तानुसार, एका ५० वर्षीय व्यक्तीनं Puerto Penascoमध्ये आपल्या एक्स गर्लफ्रेंडच्या घराखाली भुयार खोदलं. त्यानंतर तो स्वत: त्या भुयारात अडकल्याची माहिती Sonora State Attorney General दिली आहे.

मला पहिल्यांदा आवाज आल्यानंतर मांजर असल्यासारखे वाटले. मात्र, हा आवाज दररोज वाढू लागला. त्यानंतर ज्यावेळी मी याबद्दल आणखी माहिती घेतली. त्यावेळी मला समजले की माझ्या घराखाली एक भुयार आहे. आणि त्यामध्ये एक्स बॉयफ्रेंड अडकला आहे, अशी माहिती मुलीनं स्थानीय वृत्तपत्र El Universalमध्ये मुलाखतीत दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्या तरूणाला तुरूंगामध्ये पाठवण्यात आले आहे. ज्यावेळी भुयारातून काढले त्यावेळी त्याची स्थिती फारच वाईट होती. त्याला डिहायड्रेशनची समस्या झोली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 4:19 pm

Web Title: mexican man traps himself in hole he dug to spy on ex
Next Stories
1 पत्नीला शांत झोप लागण्यासाठी झुकरबर्गने बनवला ‘स्लीप बॉक्स’
2 मालकाचे प्राण वाचविण्यासाठी कुत्र्याने दिली कोब्रासोबत झुंज, अन्…
3 Fact Check: काँग्रेसच्या नेत्याने ट्विट केलेला हिटलर आणि मोदींचा फोटो खरा की खोटा?
Just Now!
X