एकीकडे आपल्या देशात मुलींचं प्रमाण झपाट्यानं घटत चाललं आहे. अनेकांना ‘वंशाचा दिवा’ हवा असतो पण ‘कन्यारत्न’ झालं की अनेक कुटुंबाचा मात्र हिरमोड होतो. पण मिशीगनमधल्या या जोडप्याच्या बाबतीत जरा उलटचं घडलं.

कॅथरी आणि जे या दाम्पत्याला १३ मुलं आहेत. नुकताच या दाम्पत्यानं १४ व्या मुलाला जन्म दिला. पण, कॅथरी आणि जे यांना मात्र कन्यारत्नाची अपेक्षा होती. यावेळी तरी कुटुंबात छोटीशी परी येईल अशी अपेक्षा होती पण कदाचित आमच्या नशीबात मुलीचं सुख नसावं अशी प्रतिक्रिया ‘डेली मेल’शी बोलताना कॅथरीनं दिली आहे. कॅथरीला एकूण १४ मुलं आहे, तिचा मोठा मुलगा हा वीस वर्षांचा आहे.

VIDEO …जेव्हा साधूचा वेश धारण करुन ब्रेट ली मुंबईतील मुलांबरोबर क्रिकेट खेळतो!

स्टेडियममध्ये वर्षभराची बंदी, सामना पाहण्यासाठी त्यानं चक्क भाड्यानं क्रेन घेतली!

आता आम्ही सोळा जणांचं कुटुंब मिळून गुण्या गोविंदानं राहू असं जे म्हणाला. ‘माझा जन्म मोठ्या कुटुंबात झाला. मीच आई-वडिलांचं चौदावं अपत्य आहे’ असं कॅथरी म्हणाली. कॅथरी आणि जेचं कुटुंब हे त्यांच्या गावातलं सर्वात मोठं कुटुंब आहे.