मॉडेलिंगच्या विश्वात ग्लॅमर, पैसा असतोच पण एक मॉडेल म्हणून वावरताना त्या व्यक्तीला आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींकडे खूप बारकाईनं लक्ष द्यावं लागतं. अॅटिट्यूड, बॉडी लँग्वेज, कपडे कॅरी करण्याचा कॉन्फिडन्स सगळ्याच गोष्टी त्या व्यक्तीला खूबीनं सांभाळता आल्या पाहिजेत. फॅशन डिझायनर्सनं तयार केलेल्या कपड्यात कितीही अवघडल्यासारखं वाटत असलं तरी तो संकोचलेपणा मोठ्या कसबीनं लपवून उंच उंच टाचांच्या चप्पल घालून कॅटवॉक करत जाणं ही नक्कीच दिसते तेवढी सोपी गोष्ट नसते.

‘गुगल’चा डुडलद्वारे या मराठमोळ्या महिला डॉक्टरला सलाम, जाणून घ्या त्यांचे कार्य

रॅम्पवर तोल जाऊन पडण्याची शक्यता जास्त असते. या इंडस्ट्रीतले शेकडो लोक तुमच्यासमोर बसलेले असतात. कॅमेरामनच्या नजरा एक एक क्षण टिपण्यासाठी तुमच्यावर खिळलेल्या असतात. अशावेळी तोल जाऊन रॅम्पवर पडणं म्हणजे एखाद्या मॉडेलसाठी नक्कीच ती घटना आयुष्यातली सर्वात वाईट घटना असते. प्रेक्षक, डिझायनर्सच्या मनात तुमच्याविषयी नकारात्मक छाप पडते. म्हणून रॅम्पवर एक एक पाऊल टाकताना मॉडेल फार दक्ष असतात. पण कधी कधी रॅम्पवर अशा दुर्देवी घटना घडतातच.

Video : छेडछाड करणाऱ्या विद्यार्थ्यांची इंडिगोच्या एअरहॉस्टेसनं घेतली ‘शाळा’

चीनमधल्या शांघाय येथे पार पडलेल्या ‘व्हिक्टोरिया सिक्रेट’ या जगप्रसिद्ध फॅशन शोमध्येही आंतरराष्ट्रीय मॉडेल मिंग शी हिच्यासोबतही असाच प्रकार घडला. पण तिनं ज्या खुबीनं ही परिस्थिती हाताळली याचं जगभरात कौतुक होत आहे. हा फॅशन शो पाहण्यासाठी जगभरातील फॅशनविश्वातले नावाजलेले जवळपास १८ हजारांहून अधिक लोक शांघायला जमले होते. या शोसाठी मिंग मॉडेलिंग करत होती. रॅम्पवरून चालत येत असताना मिंगचा उंच टाचांमुळे तोल गेला आणि ती रॅम्पवर पडली. पण तिने काही सेकंदात स्वत:ला सांभाळलं. इतर मॉडेलसारखं रॅम्पवर न रडता किंवा चेहऱ्यावरचे हावभाव अजिबात न बदलता ती सर्वांसमोर स्वत:च्या वेंधळेपणावर हसली, स्वत:ला सावरत उठली आणि कॅमेरासमोर पोज देण्यास सज्ज झाली. तिचा तो आत्मविश्वास पाहून सगळेच प्रभावित झाले आणि तिचं कौतुकही केलं.

Viral : गर्लफ्रेण्ड प्रपोज करण्यासाठी त्याने खरेदी केले २५ आयफोन

अनेकदा रॅम्पवर घसरून पडलेल्या मॉडेल सर्वांदेखत रडू लागतात किंवा त्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचा संकोचलेपणाचा भाव येतो. आपला अवघडलेपणा त्या लपवू शकत नाही पण मिंगनं मात्र ही सारी परिस्थिती मोठ्या खूबीनं हाताळून सगळ्या मॉडेलसमोर एक नवं उदाहरण ठेवलं, त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली.