20 January 2018

News Flash

झिवाच्या पहिल्या ‘अॅन्युअल डे’ ला पोहोचला कॅप्टन कूल

कार्यक्रमात झिवानं देखील भाग घेतला होता

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: January 12, 2018 3:05 PM

अनेकदा सामन्यांमुळे धोनीला आपल्या लाडक्या परीसोबत वेळ घालवता येत नाही.

सध्या भारतीय संघ कसोटी सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे तर दुसरीकडे कसोटी सामन्यातून निवृत्ती घेतलेला भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या लाडक्या मुलीसोबत निवांत वेळ घालवत आहे. नुकताचा झिवाचा पहिला वहिला अॅन्युअल डे पार पडला आणि अॅन्युअल डेसाठी धोनीही तिथे उपस्थित होता.

अनेकदा सामन्यांमुळे धोनीला आपल्या लाडक्या परीसोबत वेळ घालवता येत नाही. याची खंतही त्यानं बोलून दाखवली होती. पण, जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळतो त्यावेळी तो झिवासोबत वेळ व्यतित करतो. नुकताच झिवाच्या शाळेत अॅन्युअल डे पार पडला. अॅन्युअल डेमधील कार्यक्रमात झिवानं देखील सहभाग घेतला होता. तेव्हा झिवाचं शाळेतलं पहिलं वहिलं सादरीकरण पाहण्यासाठी कॅप्टन कूलही शाळेत पोहोचला होता. गुलाबी ड्रेस परिधान केलेली झिवा त्यावेळी गोंडस परी सारखी दिसत होती. तिच्या ‘अॅन्युअल डे’ मधले काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

First Published on January 12, 2018 3:00 pm

Web Title: ms dhoni attends daughter zivas first annual day function
  1. No Comments.