नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी पोलिसांकडून नेहमीच विविध पातळ्यांवर प्रयत्न होताना दिसतात. नुकतेच मुंबई पोलिसांनी एक आगळेवेगळे ट्विट करत नागरिकांना कार चालवताना बेल्ट लावण्याचे आवाहन केले आहे. मैदानात विक्रमांचा बादशाह असलेल्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कारमधी सीटबेल्ट लावलेला एक फोटो पोलिसांनी ट्विट केला आहे. बंगळुरु पोलिसांनीही सचिनचा हा फोटो ट्विट केला आहे. यात बंगळुरु पोलीस म्हणतात, ‘ Doesn’t matter how far. just belt up!’

एखाद्या नामवंत खेळाडूने अशाप्रकारे जागरुकतेचे काम करणे हे खऱ्या अर्थाने उपयुक्त असते. सचिनच्या या पोस्टला ३२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर हेच ट्विट मुंबई पोलrस आणि बंगळुरु पोलिसांनी सचिनच्या फोटोसकट टाकल्यावर त्यालाही हजारो लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी हे ट्विट रिट्विटही केले आहे. त्यामुळे आतातरी लोक वाहतुकीचे नियम पाळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.