धार्मिक तणावामुळे निर्माण होणाऱ्या वादाच्या किंवा हिंसाचाराच्या घटनांबद्दल आपण नेहमीच ऐकत असतो. गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजात तणाव निर्माण होण्याचे प्रमाण वाढल्याचा आरोपही अनेकांकडून करण्यात येतो. मात्र, वेळोवेळी अपवादात्मक घटनांमुळे भारतीय संस्कृतीत असणारा सामाजिक सलोख्याचा अद्भूत गुण कायमच अधोरेखित होत आला आहे. मध्य प्रदेशात नुकताच याचा प्रत्यय आला.

Viral Video : मदतीला आले आणि चोरी करून गेले..

मध्य प्रदेशमधल्या एका मुस्लिम कुटुंबानं हनुमान मंदिरासाठी आपली एक हजार नऊशे चौरस फुटांची जमीन दान करून एक नवं उदाहरण समाजापुढे ठेवलं आहे. जावेद अन्सारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपली हजारो चौरस फुटांची जमीन मंदिराच्या नावे केली. यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्याची माहिती ‘पीटीआय’नं दिली आहे. बागवाझ जिल्हातील इमलीवाले हनुमान मंदिराच्या विस्ताराचं काम सुरू आहे आणि यासाठी स्वखुशीनं अन्सारी यांनी आपली जमीन दान केली आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश लोकांना देण्यासाठी आपण जमीन दान केल्याचं अन्सारींनी म्हटलं आहे. यामुळे दोन्ही धर्मांतील मैत्रीचं नातं अधिक दृढ होईल असंही अन्सारी यांनी सांगितले.