न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. सोशल मीडियावरुन त्यांनी देशवासियांना आनंदवार्ता दिली आहे. गुरूवारी सकाळी त्यांनी मुलीला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर ३७ वर्षीय पंतप्रधान आर्डेन सहा महिन्यांसाठी रजेवर असतील. जसिंडा यांच्याबद्दल सांगायचं तर त्या आतापर्यंतच्या न्यूझीलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. पंतप्रधान पदावर असताना आई झालेल्या त्या जगातल्या दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत. याआधी बेनझीर भुत्तो या पाकिस्तानच्या पंतप्रधान असताना त्यांनी मुलीला जन्म दिला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मी सहा आठवड्यासाठी सुट्टीवर जाणार आहे तरी देशाच्या सेवेसाठी मी सदैव असेन’ असंही त्या म्हणाल्या. जानेवारी महिन्यात त्यांनी गर्भवती असल्याची आनंदवार्ता देशवासियांना दिली होती. या आनंदवार्तेनंतर अनेकांनी जसिंडा यांना सोशल मीडियावर शुभेच्छाही दिल्या आहेत. ‘मी देशाची सेवा करते. माझ्यासारख्या अनेक महिला आहेत ज्या कामही करतात आणि मुलांचे उत्तम संगोपनही करतात. त्यामुळे माझ्यासाठी हे जरी मोठं आव्हान असलं तरी मी ते स्विकारलं आहे’ अशी प्रतिक्रीया त्यांनी पूर्वी दिली होती.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand prime minister jacinda ardern give birth baby girl
First published on: 21-06-2018 at 14:01 IST