20 November 2019

News Flash

भारताचा डाव गडगडल्याने पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या, पाहा व्हायरल मिम्स

मिम्समधून पाकिस्तानी चाहत्यांनी भारतीय संघाला टोमणे मारले आहेत

मिम्समधून टोमणे

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये २४० धावांचा पाठलाग करताना भारतीय डाव कोलडमला. भारताचे दोन्ही सलामीवीर आणि कर्णधार कोहली संघाचा धावफलक ५ वर असताना तंबूत परतले. सलामीवीर के. एल. राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली प्रत्येकी एक धाव करुन बाद झाले. त्यामुळेच भारतीय संघाला पाकिस्तानी संघाचे पाठीराखे ट्रोल करतानाचे चित्र दिसत आहे. भारत साखळी सामन्यामध्ये इंग्लंडविरुद्ध मुद्दाम पराभूत झाल्याने पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला नाही. त्यामुळेच आता भारतीय संघाची अशी परिस्थिती असल्याचा टोला पाकिस्तानी चाहत्यांनी लगावला आहे. भारताच्या डाव गडगडल्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांनी अनेक मिम्स शेअर केले असून त्यातून त्यांनी भारतीय संघाला सुनावले आहे.

काय योगदान आहे

एवढी मजा का येतेय

छान खेळ न्यूझीलंडकडून

पाकिस्तानी चाहते

पाकिस्तान भारताचा हा सामना पाहताना

पाकिस्तानमध्ये आनंदोत्सव

पाकिस्तानचे फलंदाजीचे प्रशिक्षक

काय रे

पाकिस्तानचा दूत

जा माफ केलं

वाईट वाटतयं पण…

घाबरु नका

कर्म

विराट नापास

दरम्यान, भारताचा डाव गडगडल्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सावरला.

First Published on July 10, 2019 5:31 pm

Web Title: pakistan cricket fans troll indian team after dramatic collapse scsg 91
Just Now!
X