प्रवासात अनेकदा काही मजेशीर तर कधी फार त्रासदायक माणसं भेटतात. त्यांच्या मिश्किल किंवा अतिरेकी वागण्यामुळे असे लोक प्रवासात नेहमीच लक्षात राहतात. तर विमानानं प्रवासाला निघालेल्या चीनमधल्या काही प्रवाशांचा प्रवास असाच एका कारणामुळे खूपच वाईट झाला. कारण एका प्रवाशानं गरम होतंय असं कारण सांगत लँडिगच्यावेळी विमानाचा आपातकालीन दरवाजाचा उघडला. त्यामुळे प्रवाशांसकट विमान कर्मचाऱ्यांचीदेखील चांगलीच घाबरगुंडी उडाली.

या मुर्खपणासाठी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. विमानातील प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी त्याला १५ दिवसांचा तुरुंगवास आणि साडेसात लाखांचा दंड ठोठावला आहे. या प्रवाशाचं नाव चेन असल्याचं समजत आहे. २५ वर्षांच्या चेनची पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी गरम होत असल्यानं आपण विमानाची खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला पण तो अपातकालीन दरवाजा होता हे मला माहिती नव्हतं असं त्यानं सांगितलं.

ताजी हवा घेण्यासाठी त्यानं आपातकालीन दरवाजा उगडण्याचा जो मूर्खपणा केला त्यामुळे मात्र प्रवाशाचा जीव अगदी टांगणीला लागला होता.  सुदैवानं कोणतीही दुर्घटना होण्यापासून टळली.