चालत्या रेल्वेमध्ये काही घटना घडणे आणि त्यामुळे ती थांबवण्यात येण्याच्या घटना आपल्याकडे अनेकदा घडतात. यामध्ये कधी अपघात तर कधी चोरी, कधी छेड काढणे तर कधी प्रवाशांमध्ये होणारी भांडणे कारणीभूत असल्याचे दिसते. बर्लिनमध्येही नुकतीच अशीच एक घटना घडली आणि रेल्वे अचानक थांबविण्यात आली. आता ही रेल्वे थांबवण्याचे कारण ऐकून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. एक महिला आपल्या जोडीदारासोबत चालत्या रेल्वेमध्ये ओरल सेक्स करत होती. असे कृत्य करत असल्याप्रकरणी सहप्रवाशांनी या दोघांना अडवले. तेव्हा रागाने या महिलेने तक्रार करणाऱ्या प्रवाशांना मारहाण केली. जन्नोविझब्रुके आणि ओस्टबहन्हॉफ या स्थानकांदरम्यान असलेली एस ५ ही ट्रेन प्रवाशांमधील भांडणामुळे थांबविण्यात आल्याचे बर्लिन पोलीसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३६ वर्षांची एक महिला तिच्यासोबत असलेल्या ३८ वर्षीय पुरुषासोबत ओरल सेक्स करत होती. यावेळी रेल्वेमध्ये उपस्थित असलेल्या१८ वर्षांच्या एका तरुणीने असे करु नकोस असे सांगितले. याठिकाणी लहान मुले असल्याने त्यांच्या मनावर हे पाहून वाईट परिणाम होत असल्याने असे करणे चुकीचे असल्याचे तरुणीचे म्हणणे होते. तर आपल्याला ओरल सेक्स करताना डिस्टर्ब केल्याने या ३६ वर्षांच्या महिलेने आपल्याला कृत्य करण्यास विरोध करणाऱ्या तरुणीला मारण्यास सुरुवात केली. यानंतर अतर प्रवाशांकडून रेल्वेची चेन ओढण्यात आली. त्यामुळे रेल्वे पुढच्या स्टेशनवर थांबविण्यात आली. काही वेळाने सेक्स करत असलेल्या महिलेचा जोडीदारही या भांडणांमध्ये सामील झाला.  पोलिसांनी या सगळ्या प्रकराणांनंतर ३६ वर्षीय महिला आणि तिच्या जोडीदाराला ताब्यात घेतले आणि प्रकरणाची आवश्यक ती चौकशी करणार असल्याचे सांगितले. यामध्ये दोन्ही बाजूच्या हल्लेखोरांना काही प्रमाणात दुखापत झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers attacked oral sex couple in berlin train
First published on: 25-04-2018 at 18:35 IST