X
X

लोकांनी रस्त्यात ट्रक थांबवून ड्रायव्हरला पुन्हा वाजवायला सांगितला हॉर्न, जाणून घ्या का ?

READ IN APP

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे

आनंद घ्यायचा असेल तर छोट्या गोष्टींमधूनही घेता येतो. त्यासाठी नेहमी काहीतरी मोठं कारण असलं पाहिजे असं काही नाही. सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रस्त्यावर जमलेले लोक चालकाला पुन्हा एकदा हॉर्न वाजव अशी विनंती करत आहेत. आता हॉर्न पुन्हा वाजवायला सांगितलं तर त्याचं कौतुक काय असं तुम्हाला वाटत असेल. पण हा हॉर्न इतर हॉर्नप्रमाणे नसून बॉलिवूड गाण्याच्या चालीवर वाजतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ दोन दिवसांपुर्वी समोर आला होता. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे याबाबत माहिती मिळालेली नाही. पण सोशल मीडियावर अनेकजण हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील भोपाळ येथील असल्याचा दावा करत आहेत.

छोट्याशा या व्हिडीओत रस्त्यावर जमलेले लोक ट्रकला घेराव करुन उभे असलेले दिसत आहे. यावेळी ते चालकाला पुन्हा एकदा हॉर्न वाजवा अशी विनंती करताना दिसत आहेत. व्हिडीओ ‘एक बार और’ असं लोक ओरडत असल्याचं ऐकू येत आहेत. यानंतर अखेर चालकाने हॉर्न वाजवतो आणि रस्त्यावर उभे लोक जल्लोष करण्यास सुरुवात करतात.

व्हिडीओ पाहिल्यानंतर हे कोणतं गाणं आहे ओळखलंत का ? धर्मेंद्र यांचं प्रसिद्ध ‘मै जट यमला पगला दिवाना’ गाण्याची ही चाल आहे. १९७५ मध्ये आलेल्या ‘प्रतिज्ञा’ चित्रपटातील हे गाणं आजही तितकंच प्रसिद्ध आहे.

23
X