लॉकडाउन निर्बंधामुळे घरात अडकून पडल्याने अगदी कंटाळवाणा वाटत असेल तर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा निसर्गाचा अद्भूत, विलोभनीय नजारा तुमच्या मनाला अधिक प्रफुल्लित करून जात आहेत. या हिरवाईत नटलेल्या पर्वतरांगांची विलोभनीय छायाचित्रे सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहेत. ही सगळी छायाचित्रेच आपला जीव गुंतवणारी, वेड लावणारी आणि प्रेमात पाडणारी आहेत. त्यामुळे सोशल मीडियातील कुठल्याही साईट्सवर ही चित्रे नजरेस पडताच ती पुढे शेअर करण्यावाचून कुणी थांबत नाही.

निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची केलेली उधळण…हिरवाईने नटलेले उंचच उंच डोंगर, हिरव्यागार निसर्गाने जणू पांढरी शाल पांगरल्याचा अनुभव या व्हायरल फोटोंमधून पहायला मिळतो. डोळ्यांचे पारणे फेडणारे हे निसर्गरम्य दृश्य यूएसमधली आहेत. यूएसमधल्या नॅशनल पार्कमधला हा परिसर नेहमीच डोळ्याला भूरळ घालणारा आहे. यूएसमधल्या नॅशनल पार्कच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहेत. हे दृश्य इतकं भारी होतं की प्रत्येकाचं मन मोहून गेलंय. प्रत्येकाला हे दृश्य आकर्षित करतंय. निसर्गप्रेमींसाठी तर हा खास नजारा होता. लोकांनी हे फोटो अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत.

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

आणखी वाचा : पाण्यात जाताच रंग बदलणारा ऑक्टोपस कधी पाहिलाय? भन्नाट व्हिडीओ व्हायरल!

आणखी वाचा : अवघे पाऊणशे वयमान! ७३ वर्षांच्या आजोबांचं कसब पाहून नेटिझन्स झाले अवाक्
आकाशाला टेकणाऱ्या टेकड्या, पठारं, आल्हाददायक वातावरण आणि आजूबाजूची हिरवळ पाहून मन प्रसन्न होतं, हा जणू धर्तीवरील स्वर्ग भासतो. सूर्याच्या किरणांनी तर हा सारा नजारा आणखी उजळून निघालाय. सायंकाळच्या वेळी या परिसराला केशरी रंगाची शालू पांघरल्याचा भास होतोय. सर्व दृश्ये निसर्गाची किमया दाखवून जातात.

यूएसमधल्या निसर्गाचे हे मनमोहक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोवर सोशल मीडियात विविध प्रतिक्रियादेखील दिल्या जात आहेत. निसर्गाचा हा आगळा वेगळा अविष्कार पाहून तुमचे डोळे नक्की तृप्त होतील. रोजच्या ताणतणावातून अशा प्रकारचा निसर्गाचा सुंदर नजारा पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं, मात्र निसर्ग असाच अबाधित राखण्यासाठी देखील सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे.