एरवी सत्तरी ओलांडली की अनेकजण अंथरुणाला खिळतात. काही जण नातवंडासोबत खेळण्यात रमताना दिसून येतात. पण सध्याच्या घडीला ७३ वर्षीय चीरतरूण आजोबा मैदान गाजवत असल्याचं आता समोर आलंय. या ७३ वर्षाच्या खेळाडूचा व्हिडीओ सध्याच्या घडीला सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याचं दिसतंय. या आजोबांचं कूल स्केटबोर्डींग पाहून सारेच थक्क झाले आहेत.

या व्हिडीओमधील ७३ वर्षीय आजोबांचं नाव इगोर असं आहे. इगोर हे १९८१ सालापासून स्केटबोर्डींग करत आहेत. वयाच्या ७३ व्या वर्षी चेहऱ्यावर सुरकुत्या आणि किरकोळ शरीरयष्टी असली तरी, त्यांच्यात अजूनही तितकाच जोश आहे. या वयातही ते तेवढ्याच वेगाने व सफाईदारपणे स्केटबोर्डींग करतात. गेल्या ४० वर्षापासून ते अतिशय शानदार पद्धतीने स्केटबोर्डीग करत आहेत. या आजोबांच्या स्केटबोर्डींगचा व्हिडीओ कोच मॅक्स तिमुखिन यांच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हे आजोबा सध्या सोशल मीडियावरील सेलिब्रिटी बनले आहेत. वय जास्त असूनही ते अगदी कूल स्केटबोर्डींग करताना दिसून येत आहेत. त्यांच्या या करामतीमुळे ते सर्वांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

आणखी वाचा : पाण्यात जाताच रंग बदलणारा ऑक्टोपस कधी पाहिलाय? भन्नाट व्हिडीओ व्हायरल!

 

View this post on Instagram

 

A post shared by Max Timukhin (@timukhinmax)

आणखी वाचा : भाज्यांच्या सालीपासून बनवला इकोफ्रेंडली कागद; ११ वर्षीय चिमुरडीचा यशस्वी प्रयत्न
रस्त्यावर स्केटबोर्डींग करताना या आजोबांच्या अंगात सळसळून उर्जा वाहत आहे. अगदी तरूणांसारखी चपळता त्यांच्या अंगी दिसून येतेय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आजोबा कुठेही धरपडताना किंवा थकलेले दिसून आले नाहीत. सोशल मीडियाव हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. आतापर्यंत तीन मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून अनेकांनी तो लाईकही केला आहे. या व्हीडिओवरील लोकांच्या मजेशीर कमेंटसही तितक्याच मनोरंजक आहेत.