अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांन्का ट्रम्प आंतरराष्ट्रीय उद्योजकता परिषदेसाठी भारतात आली आहे. यावेळी इव्हांका यांनी पतंप्रधान मोदींची भेट घेतली, इव्हांका पहिल्यांदाच भारतात येत असल्याने मोदींनी आठवण म्हणून त्यांना खास भेटवस्तू दिली. मोदींनी इव्हांकाला लाकडाची एक पेटी भेट म्हणून दिली. या पेटीवर गुजरातमधील लोककलेचं पारंपारिक नक्षीकाम करण्यात आलं आहे. या नक्षीकामाला ‘सडेली क्राफ्ट’ नावानेही ओळखलं जातं. सुरतजवळच्या परिसरात हे नक्षीकाम केलं जातं. इतकंच नाही तर या परिषदेच्या पहिल्याच दिवशी मोदींनी इव्हांन्का यांच्यासाठी खास दावतही ठेवली होती. जगातल्या सर्वांत मोठ्या डायनिंग हॉल ताज फलकनुमा पॅलेसमध्ये हैदराबादी पद्धतीची दावत त्यांच्या स्वागतासाठी ठेवण्यात आली होती.

हैदराबादच्या जागतिक परिषदेत अवघ्या १३ वर्षांच्या उद्योजकाचा सहभाग

Video : जळगावच्या या ‘सिक्रेट सुपरस्टार’साठी एक लाईक तर बनतोच ना!

GES परिषदेच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी इव्हांकानं मोदींचं भरभरून कौतुक केलं. मोदी यांनी त्यांच्या आयुष्यात केलेले प्रयत्न आणि एक सामान्य चहावाला ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. माणसाने ठरवले तर आमूलाग्र बदल घडू शकतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून समजते असे, गौरवोद्गार इव्हांन्का ट्रम्प यांनी काढले होते.