अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इव्हांका ट्रम्प पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर असणार आहे. २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान जागतिक उद्योजक शिखर परिषदेसाठी ती भारतात येणार आहे. तिच्या स्वागतासाठी खास जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच महिन्याच्या सुरूवातीपासूनच शहरातील भिकाऱ्यांवर भीक मागण्यास बंदी घालण्यात आली आहे. ८ नोव्हेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत भिकाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे इव्हांका भारतात येण्याआधीच त्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली.

विसरभोळेपणाचा कहर ; २० वर्षांपूर्वी पार्क केलेली कार सापडली त्याच ठिकाणी

जाणून घ्या अमेरिकेतल्या सर्वात आवडत्या ‘थँक्सगिव्हिंग’ सणाबदद्ल

.. म्हणून त्रिपुरातील अनेक वृत्तपत्रांनी ‘अग्रलेख’ छापलाच नाही

इव्हांकासाठी जगातील सर्वात मोठ्या डायनिंग हॉलमध्ये मेजवानीदेखील देण्यात येणार आहे. ताज फलकनुमा पॅलेसमध्ये इव्हांका आणि परिषदेस आलेली इतर मंडळी रात्रीचे जेवण घेणार आहे. ताज फलकनुमा पॅलेसमध्ये जगातील सर्वात मोठं डायनिंग हॉल आहे. ही दावत इव्हांका आणि इतरांसाठी खास ठरणार आहे. यासाठी खास भारतीय व्यंजनांची जय्यत तयारी करण्यात आल्याचंही समजत आहे. काही महिन्यांपूर्वी मोदी अमेरिकेत गेले होते, तेव्हा त्यांनी इव्हांकाला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. दिवाळीत इव्हांकानं भारतीयांना शुभेच्छा देत भारतात येण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले होते.