07 December 2019

News Flash

Video : प्रिया प्रकाश वारियरचा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल…

भुवया उंचावण्याने आणि नजरेच्या एका बाणाने संपूर्ण देशभरातील अनेकांचीच मनं जिंकली होती

मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’मधील ‘माणिक्य मलरया पूवी’ या एका गाण्यामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर आठवतेय का? अगदी बरोबर ओळखलंत. ही तिच प्रिया आहे, जिच्या भुवया उंचावण्याने आणि नजरेच्या एका बाणाने संपूर्ण देशभरातील अनेकांचीच मनं जिंकली होती. अवघ्या काही सेकंदांची तिची झलक पाहून असंख्य चाहत्यांनी तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणूनच घोषित केलं होतं. गेल्या वर्षी एका दिवसांत सोशल मीडियावर फेमस झालेली प्रिया प्रकाश वारियरने अनेक तरुणांवर भूरळ पाडली आहे. तिचे व्हिडिओज इतक्या जलद गतीने व्हायरल झाले की व्हायरल गर्ल ही तिची वेगळी ओळख निर्माण झाली. आता या व्हायरल गर्लचा आणखी व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत प्रिया आणि सिनेमातील सहकलाकार रोशन अब्दुल रऊफ यांचा किसिंग सीन आहे. उरु अदार लव या चित्रपटातील हा सीन आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सनी नाराजी प्रिया प्रकाशच्या या सीनवर नाराजी व्यक्त केली आहे.

प्रिया प्रकाश वारियर ‘श्रीदेवी बंगलो’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलरवरून वाद निर्माण झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा अपघाती मृत्यू यात बरंच साम्य आहे म्हणूनच ट्रेलरवर बोनी कपूर यांनी आक्षेप घेतला होता. बोनी कपूर यांच्या आक्षेपानंतर पहिल्यांदाच प्रियानं यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

‘श्रीदेवी हे फक्त माझ्या भूमिकेचं नाव आहे. हा चित्रपट खरंच श्रीदेवी यांच्या जीवनाशी साधर्म्य दाखवणारा आहे का हे चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनाच ठरवू दे पण आम्हाला कोणात्याही प्रकारचा वाद निर्माण करायचा नाही हे नक्की’ असं म्हणत प्रियानं आपलं स्पष्टीकरण दिलं आहे.

First Published on February 7, 2019 3:33 pm

Web Title: priya prakash varrier and roshan abduls liplock video goes viral internet is not happy
Just Now!
X