News Flash

राजस्थानचे शेतकरी अॅमेझॉनवर विकतायेत गोवऱ्या

शेणाच्या गोवऱ्यांची मागणी वाढतेय

गगनदीप सिंह, अमनप्रीत सिंह आणि उत्तमजोत सिंह या तिघा व्यावसायिकांनी मिळून गोवऱ्या विकण्याची ही कल्पना लढवली आहे.

आजच्या जगात तुमचे उत्पादन तुम्हाला विकायचे असेल तर जाहिरात ही कला आलीच पाहिजे, पण त्याचबरोबर ती वस्तू कुठे विकली तर आपल्याला जास्त फायदा मिळेल याचंही ज्ञान असलं पाहिजे. जर या दोन्ही गोष्टीचं ज्ञान तुमच्याकडे असेल तर मग तुमचा व्यवसाय एकदम तुफान चालणार यात तिळमात्र शंका नाही. या कला अवगत असणाऱ्यांची अगदी मातीही सहज विकली जाईल. हाच फंडा घेऊन राजस्थानच्या तीन तरूणांनी एक नवा व्यवसाय सुरू केला. यांनी चक्क शेणाच्या गोवऱ्या विकायचं ठरवलं आहे, तेही स्थानिक बाजारपेठात वगैरे नाही तर चक्क अॅमेझॉन या ई-कॉमर्स वेबसाईटवर. तुम्हालाही थोडा धक्का बसला असेल ना? पण हे खरं आहे. राजस्थानमधल्या कोटा इथे राहणाऱ्या तीन मित्रांनी ‘एपीईआई ऑर्गेनिक फूड्स’ नावाची कंपनी स्थापन केली. या तिघांची डेअरी देखील आहे. पण नेहमीपेक्षा त्यांना काहीतरी हटके करायचं या विचारांनी तिघेही झपाटले होते, तेव्हा या तिघांनी शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्या ऑनलाइन विकायच्या ठरवल्या.

वाचा : केरळच्या आमदार आणि IAS अधिकाऱ्याची ‘प्यारवाली लव्हस्टोरी’!

VIRAL VIDEO : पर्यटकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे माकड झाले ‘लठ्ठ’

गगनदीप सिंह, अमनप्रीत सिंह आणि उत्तमजोत सिंह या तिघा व्यावसायिकांनी मिळून गोवऱ्या विकण्याची ही कल्पना लढवली आहे. ‘आपण गेल्या तीन महिन्यांपासून गोवऱ्यांची ऑनलाइन विक्री करत आहोत आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळत असल्याचे अनमप्रीत सिंह यांनी सांगितले. १२० रुपये प्रतिडझन प्रमाणे या गोवऱ्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. गेल्या ती महिन्यांपासून त्यांनी १ हजारांहून अधिक गोवऱ्यांची विक्री केली असल्याचेही अनप्रीत यांनी सांगितले. विशेष म्हणजे मुंबई, पुणे आणि दिल्लीतून या गोवऱ्यांना मोठी मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. हळूहळू हा व्यवसाय आणखी वाढत जाईल याची आपल्याला खात्री आहे असा आशावादही सिंह यांनी व्यक्त केला आहे.
गावाकडे गोवऱ्या हाताने तयार केल्या जातात, पण या तिघांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून या गोवऱ्या तयार केल्या आहेत. गोवऱ्याचा आकार एकसारखा असावा यासाठी साच्याचा वापर केला जातो, तसेच या गोवऱ्या तुटू नये म्हणून त्यांचे व्यवस्थित पॅकेजिंगही केलं जातं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 9:13 am

Web Title: rajasthan farmers selling cow dung cakes on amazon
Next Stories
1 VIRAL VIDEO: ८ वर्षांच्या लहानग्याने रचला विश्वविक्रम
2 हिंदी लिहिता येईना म्हणून मुलीला ‘तो’ नापसंत!
3 तेरा वर्षांच्या विद्यार्थ्यांनी टाकाऊ बाटल्यांपासून बनवले शौचालय
Just Now!
X