07 December 2019

News Flash

वाचा भूलोकीचे नंदनवन ‘मुघल गार्डन’बद्दल रंजक गोष्टी

रंगीबेरंगी ८ प्रजातींच्या ट्युलिप्सच्या बागा या राष्ट्रपती भवनातील प्रमुख आकर्षण आहे.

मुघल गार्डन

राष्ट्रपती भवनातली भूलोकीचे नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं ‘मुघल गार्डन’ सर्वसामान्य पर्यटकांसाठी खुल करण्यात आलं आहे. फेब्रुवारी ते मार्च पर्यंत ही बाग पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहे. ही बाग पाहण्यासाठी भारतातूनच नाही तर परदेशातूनही हजारो पर्यटक येतात. चला तर मग हजारो पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या बागेबद्दल जाणून घेऊयात काही रंजक गोष्टी

– राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन म्हणजे मुघल साम्राज्याच्या ऐश्वर्यपूर्ण सौंदर्याचा नजराणा आहे. या बागेवर मुघल-ब्रिटिश सौंदर्याची छाप आहे. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात सर्वसमान्यांना या शाही बागेत फेरफटका मारण्याची संधी मिळते.
-१३ एकरात पसरलेली ही बाग राष्ट्रपती भवनाच्या पिछाडीस आहे.

छाया सौजन्य : Tashi Tobgyal

– या बगीचाचा आराखडा प्रख्यात वास्तुविशारदाकडे सर एडविन लचिन्स यांनी तयार केला आहे. कलेचे कोणतेच तांत्रिक शिक्षण घेतलेले नसताना अंगभूत हुशारी आणि कल्पकतेने एडविन लचिन्सने इंग्लंडमध्ये अनेक अमीर, उमराव, सरदारांच्या इमारती बांधल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रपती भवनाचा आराखडाही त्यांनीच तयार केला. या मुघल गार्डनची निर्मिती करून एडविन लचिन्सन यांनी आपली सौंदर्यदृष्टी दाखवली आहे.

छाया सौजन्य : Tashi Tobgyal

– देशातील अप्रतिम बगीच्यांमध्ये ही बाग आजही आपला नावलौकिक राखत अग्रेसर आहे.
– रंगीबेरंगी ८ प्रजातींच्या ट्युलिप्सच्या बागा या राष्ट्रपती भवनातील प्रमुख आकर्षण आहे. येथे ट्युलिप्सची एकूण १० हजार रोपटी आहेत. ही ट्युलिप्स खास नेदरलँड्स वरून मागवण्यात आली.

छाया सौजन्य : Tashi Tobgyal

– या बागेत असणारे सहा कमळाकृती कारंजी तिच्या सौंदर्यात आणखी भर घालताहेत मुघल गार्डनच्या भोवती कार्यालयीन इमारती, कर्मचारी निवास व्यवस्था आहे.
– ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या कलात्मक दृष्टीतून साकारलेली ही अनोखी बाग पाहणं हा पर्यटकांसाठी नेहमीच असीम आनंद असतो.

First Published on February 8, 2019 2:34 pm

Web Title: rashtrapati bhavan iconic mughal gardens intresting facts
Just Now!
X