News Flash

Republic Day 2019 : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुगलचं हे विशेष डुडल पाहिलंत का?

गुगलनं ‘डुडल’च्या माध्यमातून भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गुगलनं ‘डुडल’च्या माध्यमातून भारताच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती भवन आणि राजपथावरील सामर्थ, संस्कृती आणि वैविध्यता गुगलनं आपल्या डुडलच्या माध्यामातून साकारली आहे. सात रंगात ही वैविध्यता दाखवण्यात आली आहे. गुगलच्या डुडलमध्ये भारताचे सामर्थ सात रंगात उठून दिसत आहे. दिल्लीत विजय चौक येथून संचलनाला सुरुवात होणार आहे. राजपथ, टिळक मार्ग, बहादूर शाह झफर मार्ग, नेताजी सुभाष मार्ग मार्गे लाल किल्ला येथे परेडची सांगता होईल. सुमारे ९० मिनिटांचा हा शानदार सोहळा असेल. यात २२ राज्यांचे चित्ररथ आणि केंद्र सरकारच्या विविध विभागांचे चित्ररथ सहभागी होतील. दरवर्षी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला गुगल डुडलमार्फत देशवासीयांना शुभेच्छा देते.

ब्रिटिशांच्या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो. २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता.

भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० साली साजरा करण्यात आला होती. १९५० रोजी आपल्याला भारताचं संविधान आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या रुपात भारताचे प्रथम राष्ट्रपती मिळाले होते. भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून विविध देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्याचीही परंपरा सुरू झाली. पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकर्णो भारताचे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामफोसा हे प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 9:57 am

Web Title: republic day 2019 google celebrates indias r day with colourful doodle
Next Stories
1 VIDEO: नेटकरी म्हणतात हा पहा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींमधील फरक
2 VIDEO: राज ठाकरेच बाळासाहेबांचे उत्तराधिकारी, मनसैनिकांचा ‘ठाकरे-2.0’
3 अबब ! एकच ड्रेस पुन्हा घालावा लागू नये म्हणून पत्नीसाठी विकत घेतले 55 हजार ड्रेस
Just Now!
X