News Flash

Viral Video: युट्यूबरने वैतागून अडीच कोटींची मर्सिडीज पेटवून दिली, व्हिडीओ पाहून धक्का बसेल

व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

युट्यूबरने आपली चक्क आपल्या मर्सिडीज कारला आग लावून पेटवून दिल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Motor1.com ने दिलेल्या माहितीनुसार, मिखैल रशियन ब्लॉगर आहे. वारंवार कारमध्ये होणाऱ्या समस्यांना वैतागून मिखैलने एका मोकळ्या शेतात कार पेटवून दिली असून त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. मिखैलने आग लावून राख केलेल्या Mercedes-AMG GT 63 S ची किंमत तब्बल दोन कोटी ४० लाख इतकी आहे.

मिखैलला मर्सिडीज खरेदी केल्यापासूनच अनेक समस्या जाणवत आहेत. त्याने पाच वेळा कार खऱाब झाल्याने डिलरकडे पाठवली होती. पण प्रत्येकवेळी कार दुरुस्त झाल्यानंतरही समस्या काही संपत नव्हत्या. कार दुरुस्त होण्यामध्ये ४० दिवस लागले. कंपनीकडून काही पार्टही बदलण्यात आले. पण जेव्हा त्यानंतरही कार खराब झाली तेव्हा मात्र डिलरशिपने मिखैलच्या फोनला उत्तर देणंही थांबवलं.

मिखैल ज्याला मिशा या नावानेही ओळखलं जातं. वारंवार येणाऱ्या समस्यांवर अखेरचा उपाय म्हणून मिखैलने कारला पेटवून देण्याचा निर्णय घेतला. मिखैलने पाच दिवसांपूर्वी आपल्या युट्यूब चॅनेलवर आपल्या कारला आग लावल्याचा व्हिडीओ शेअऱ केला आहे. आपल्याला यामध्ये कोणताही आनंद होत नसल्याचं त्याने म्हटलं आहे.

हा व्हिडीओ १ कोटींपेक्षा जास्त लोकांना पाहिला आहे. मिखैलचे ५० लाखांपेक्षा जास्त सबस्क्राइबर्स आहेत. मिखैलचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असून तू असं का करु शकतोस असं विचारलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 9:23 am

Web Title: russian youtuber mikhail litvin burns his mercedes out of frustration sgy 87
Next Stories
1 Video : ऐकावं ते नवलंच! डोळ्यातून निघाल्या चक्क अळ्या
2 Video : विकेट मिळत नसल्यामुळे हतबल विराटची सूर्यकुमारला ‘टशन’, मैदानात रंगलं अनोखं युद्ध
3 धक्कादायक! कोंबड्याने घेतला पोलीस अधिकाऱ्याचा जीव
Just Now!
X