करोना विषाणूचा सामना करण्यासाठी संपूर्ण देशात लॉकाडउनची घोषणा करण्यात आली होती. दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ भारतात एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळवला गेलेला नाही. बीसीसीआयने आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला आहे. याचसोबत खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने श्रीलंका आणि झिम्बाब्वेविरुद्धचा दौराही रद्द केलाय. लॉकडाउनच्या काळात सर्व क्रिकेटपटू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. सलामीवीर शिखर धवन या काळात सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे.

केंद्र सरकारने परिस्थितीचा अंदाज घेत काहीकाही गोष्टी सुरु करण्याची परवानगी दिल्यानंतर, शिखरने आपला मुलगा झोरावरसोबत एक महत्वाची गोष्ट केली आहे. शिखरने आपल्या मुलासोबत रस्त्यावर फिरणाऱ्या गाईंना अन्न दिलं आहे. प्रत्येक जिवाची किंमत माझ्या मुलाला कळायला हवी, भुकेलेल्या जनावारांना अन्न देणं हे माझ्यासाठी तितकच महत्वाचं आहे, अशा आशयचा संदेश टाकत शिखरने व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

आपला मुलगा, पत्नी आणि मुलींसोबत डान्स करतानाचे व्हिडीओ, फोटो शिखर सोशल मीडियावर शेअर करत असतो. आयपीएलमध्ये शिखर दिल्ली कॅपिटल्स संघाचं प्रतिनिधीत्व करतो.