11 August 2020

News Flash

Viral Video : नोकरी गेली तर इस्लाम धर्म स्वीकारण्याची शिक्षण सेवकांची सरकारला धमकी

सध्या हे प्रकरण खूपच गाजतंय

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर मात्र नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.

सध्या उत्तर प्रदेशमधल्या शिक्षण सेवकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर गाजतोय. या व्हिडिओमध्ये काही शिक्षण सेवकांनी आपली नोकरी गेली तर सरळ इस्लाम धर्माचा स्वीकार करू, अशा उघड धमक्या दिल्यात. इस्लाम स्वीकारून अल्लाह हू अकबरचे नारे देऊ, अशा धमक्या देत शिक्षण सेवकांनी आपला राग व्यक्त केलाय. एका हिंदी वृत्तपत्राच्या पत्रकाराने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला. यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

२६ मे १९९९ मध्ये सरकारी शाळांत ११ महिन्यांसाठी बारावी पास शिक्षण सेवकांची नियुक्ती करण्यास सुरुवात झाली होती. पण २५ जुलै २०१७ ला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक भरतीची परीक्षा देणं शिक्षण सेवकांना अनिवार्य करण्यात आले आहे. ही परीक्षा पास होण्यासाठी त्यांना दोन संधी देण्यात येणार आहे. तेव्हा या मुद्द्यावरून एकूणच शिक्षण सेवकांमध्ये नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी यावरून शिक्षण सेवकांनी आंदोलनही केलं होतं. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये अनेक शिक्षण सेवक आहेत जे उघडपणे सरकारला इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी देत आहे. ‘गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही शाळकरी मुलांना शिकवत आहोत. तेव्हा सरकारला आमच्यामध्ये शिकवण्याची पात्रता नाही असं अजिबात वाटलं नव्हतं. त्यावेळी आम्हाला फक्त ३ हजार रुपये पगार मिळायचा. पण तरीही आम्ही मुलांना शिकवत होतो. आता आम्हाला दरमहा ३५ हजार पगार मिळतोय तर अचानक आमच्यामध्ये योग्यता नाही असं सरकारला का वाटू लागलंय? असा सवाल त्यांनी केलाय.

एवढंच नाही तर यात काही हितसंबध जोडले असून, आमच्या जागेवर इथल्या नेतेमंडळींना स्वत:च्या नातेवाईकांना नोकरी द्यायची आहे, असेही आरोप त्यांनी केलेत. तेव्हा जर आमच्या नोकरीवर गदा आलीच तर आम्ही कुटुंबासकट इस्लाम धर्म स्वीकारून अल्लाहू अकबरचे नारे देऊ आणि जिहाद करू अशाही धमक्या त्यांनी सरकारला दिल्या आहे. हा व्हिडिओ नेमक्या कोणत्या ठिकाणचा आहे हे मात्र कळू शकले नाही पण तो पाहून सोशल मीडियावर मात्र नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2017 4:50 pm

Web Title: shiksha mitra uttar pradesh video goes viral on social media says to convert in islam
Next Stories
1 आणि एवढा मासा खाणे त्यांना पडले महागात
2 डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेलं चित्र पाहिलंत का?
3 Viral Video : चोर आहे की भूत? 
Just Now!
X