सेल्फी काढण्याच्या नादात झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेकजण आपले प्राण गमावतात. अशी अनेक उदाहरणं आपल्याला माहिती असतील. तरीही केवळ सेल्फीसाठी आपला जीव लोक धोक्यात घालण्याचा मूर्खपणा लोक का करतात?, हे मात्र न उलगडणारं कोडचं आहे. नुकतीच इंडोनेशियामध्ये अशीच एक घटना घडली आहे. रुळावर सेल्फी काढण्याच्या नादात एक अल्पवयीन मुलीला रेल्वेची धडक बसली. या धडकेत तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहे.

गेम खेळून झाला जगातील ‘श्रीमंत यूट्युबर’, वार्षिक कमाई ८० कोटी

या मुलीचं नाव एली हयाती असल्याचं समजत आहे. ती १६ वर्षांची आहे. इली आणि तिच्या इतर तीन मैत्रिणी रेल्वे रुळावर सेल्फी काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांना सगळ्यात हटके सेल्फी काढायचा होता. म्हणूच त्या रेल्वेरुळाच्या कडेला जाऊन बसल्या. मागून ट्रेन गेली की आपण सेल्फी काढायचा असा त्यांचा प्रयत्न होता. पण या नादात एलीचा अंदाज पूर्णपणे चुकला. ट्रेन आल्यावर सगळ्या कडेला बसून एली मात्र उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नात ट्रेनची धडक तिच्या डोक्याला बसली. ती कोसळून एका बाजूला पडली तरी तिच्या मैत्रिणी मात्र सेल्फी काढण्यात गुंग होत्या.

Video : हत्तीचा प्रवासी बसवर हल्ला, गाडीत अडकलेल्या चालकाची अखेर सुटका

अखेर ट्रेन निघून गेल्यानंतर आपल्या मैत्रिणीला गंभीर दुखापत झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तिला स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात तिच्या मेंदूला दुखापत झाली असून तिची प्रकृती सध्या गंभीर आहे.