नोटाबंदीच्या निर्णयाला वर्षपूर्ती झाली. एकीकडे हा निर्यण योग्यच होता असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे समर्थक छातीठोकपणे सांगत आहेत, तर हा सर्वात चुकीचा निर्णय होता असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांच मत आहे. या काळात रोकडविरहित व्यवहारांकडे भारतीयांनी वळावं, असं आवाहनही खुद्द पंतप्रधानांनी केलं होतं, त्यानुसार अनेकांनी ‘कॅशलेस’ व्यवहारांचा पर्याय स्वीकारला. आपण पूर्णपणे कॅशलेस व्हायला अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे पण जगाच्या पाठीवर एक असा देश आहे जिथे सर्वाधिक कॅशलेस व्यवहार होतात. नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्तानं कॅशलेस व्यवहारांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्वीडनची पुन्हा एकदा आठवण काढली जात आहे.

VIDEO : धुकं की धबधबा?, पाहा निसर्गाचा चक्रावून टाकणारा चमत्कार

संपूर्ण जगभरातील किमान ७५ टक्के अर्थव्यवस्था कागदी नोटांच्या व्यवहारावरच चालते, पण स्वीडन मात्र रोकडविरहित व्यवहारांना प्राधान्य देतो. २०३० पर्यंत स्वीडन जगातील पहिला कॅशलेस देश ठरेल असा अंदाज वर्तवला जात आहे. दैनंदिन बस, लोकलचे प्रवासभाडे, रस्त्याकडेच्या पेपरवाल्याचे पैसे तसेच बेरोजगार भत्ताही डिजिटल माध्यमाद्वारेच दिला जातो. येथे ८०% लोक डिजिटल चलनात व्यवहार करतात. त्यामुळे जगाच्या पाठीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहार करणारा स्वीडन हा एकमेव देश आहे.  येथे दुकानदारच काय अगदी बसचा कंडक्टरसुद्धा पैसे स्विकारत नाही जे काही होतं ते पूर्णपणे डिजिटल माध्यामातूनच चालते.

Viral Video : ‘वेडिंग फोटोग्राफी’ करताय?, मग ‘या’ जोडप्यासारखी चूक करू नका