News Flash

जितका सुंदर फोटो तितकीच सुंदर कथा… जाणून घ्या दुबईमध्ये व्हायरल होणाऱ्या भारतीयाच्या फोटोची गोष्टी

लाखो लोकांनी हा फोटो लाइक आणि शेअर केलाय

फोटो : thehappyboxofficial इन्टाग्रामवरुन

दुबईमधील एका भारतीय कर्मचाऱ्याचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. मूळचा तेलंगणाच्या असणाऱ्या या कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसाठी केलेली आगळीवेगळी कलाकृती सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहे. रमेश गंगाराजन गांधी असे या व्यक्तीचे नाव असून तो सफाई कर्मचारी आहे. एका ठिकाणी फुटपाथवर पडलेली झाडाची वाळेली पानं झाडत असताना त्याने या पडलेल्या पानांपासून हृदयाचा आकार तयार केला. “पानांपासून तो आकार तयार करताना मी भारतामध्ये असलेल्या माझ्या पत्नीचा विचार करत होतो. सध्या मला तिची खूप आठवण येते,” असं रमेशने गल्फ न्यूजशी बोलताना सांगितलं आहे. नेस्मा फराहत या महिलेने रमेशला पानांपासून ही कलाकृती साकारताना पाहिले आणि त्याचा फोटो काढून इन्टाग्रामवर पोस्ट केला. त्यानंतर हा फोटो व्हायरल झाला.

नक्की वाचा >> …आणि भारतीयांनी मागितली Lund University ची माफी

‘द नॅशनल’ने दिलेल्या वृत्तानुसार रमेश हा तेलंगणमधील असून तो १० महिन्यापूर्वी दुबईला आला आहे. अमिरील सर्व्हिसेस एलएलसी या कंपनीमध्ये रमेश हाऊस किंपिंगचे काम करतो. रमेश आणि लता या दोघांचे सप्टेंबर २०१९ मध्ये लग्न झाला. त्यानंतर महिन्याभरातच रमेश दुबईला आला आणि लता मात्र भारतातच आहे. इतरही अनेक पेसेजसवर या फोटो व्हायरल झाला आहे. त्यापैकी गुड न्यूज स्टोरीज हे ही एक पेज असून या पेजच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या सकारात्मक पोस्ट शेअर करण्यात येतात.

“मी तिच्याबद्दल विचार करत होतो हे समजल्यानंतर तिला खूप आनंद झाला. अनेकांना आपल्याबद्दल जाणून घ्यायचं आहे हे तिला सांगितलं. तेव्हा मात्र तिला आश्चर्य वाटलं,” अशं रमेशने हा फोटो व्हायरल होण्यासंदर्भात गल्फ न्यूजशी चर्चा करताना म्हटलं आहे. रमेशने दुबईमधील एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे पत्नीबरोबरच एकही फोटो नाहीय. इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना रमेशने पत्नीची आठवण येत असून लग्नानंतर आणखीन थोडा काळ तिच्याबरोबर एकत्र राहता आला असतं तर अधिक छान वाटलं असतं असं रमेशने सांगितलं. तसेच त्याने घरच्यांचीही खूप आठवण येत असल्याचेही म्हटले आहे.

नक्की वाचा >> लॉट्रीमध्ये ‘तो’ १६५ कोटी जिंकला ; मात्र एका खास कारणासाठी अर्धा हिस्सा मित्राला दिला

करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक कामगार वेगवेगळ्या देशांमध्ये अडकून पडले आहेत. अनेकांना त्यांच्या कटुंबियांपासून लांब रहावे लागत आहे. त्यामुळेच हा फोटो त्या लोकांच्या भावनाही व्यक्त करत असल्याने अनेकांनी कमेंटमध्ये म्हटले आहे.

अनेकांनी हा फोटो काढणाऱ्या नेस्माशी संपर्क करुन रमेशला धन्यवाद सांगण्यास सांगितलं आहे. त्याच्या या फोटोमुळे आम्हालाही सध्याच्या परिस्थितीशी लढण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार रमेशचे वडील आजारी असून लवकरच तो भारतामध्ये येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 9:18 am

Web Title: telangana man in dubai makes heart with petals on road for wife in india pic goes viral scsg 91
Next Stories
1 भाजपाकडूनच बॅन केलेल्या चिनी अ‍ॅपचा वापर; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
2 …आणि भारतीयांनी मागितली Lund University ची माफी
3 …आणि पंतप्रधान मोदींनी मजुराच्या मुलाशी फोनवरुन साधला संवाद
Just Now!
X