जम्मू काश्मीरमधील दल सरोवराच्या किनाऱ्यावर असलेलं आशियातील सर्वात मोठं ट्यूलिप गार्डन रविवारपासून पर्यटकांसाठी खुलं करण्यात आलं आहे. हे गार्डन १५ हेक्टर क्षेत्रात पसरलं आहे. या गार्डनमध्ये ५३ प्रकारची जवळपास १० लाखांहून अधिक ट्यूलिप येत्या महिन्याभरात उमलणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्वी सिराज बाग म्हणून प्रसिद्ध असलेल्या भागात तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी २००८ मध्ये टय़ूलिप गार्डन सुरू केले होते. दहा वर्षांत आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप गार्डनचा मान या गार्डनला मिळाला. या आठवड्याच्या सुरुवातीलाच ट्युलिप गार्डनमधल्या २० टक्के रोपट्यांना बहार आल्याचं रोपवाटिका विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. काश्मीर खोऱ्यातील पर्यटनाच्या दृष्टीनं ट्यूलिप गार्डन खूप महत्त्वाचे आहे. दरवर्षी लाखो लोक देशभरातूनच नाही तर परदेशातूनही पृथ्वीवरील हे नंदनवन पाहण्यासाठी काश्मीरमध्ये येतात.

ट्यूलिप गार्डनमुळे येथील पर्यटनाला चालना मिळेल असं विश्वास सरकारला आहे. २५ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत हे ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले राहणार आहे. ट्यूलिप फुलांचा जीवनकाळ चार आठवडे असतो, जास्त उन्हानं ती मरू शकतात. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्यात येते. टय़ूलिपशिवाय हायसिंथ, नारसिसस, डॅफोडिल्स म्युसकुरिया व इरिस ही फुलेही तेथे आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The valley welcomes tulip flowers at the indira gandhi memorial tulip garden
First published on: 26-03-2018 at 11:32 IST