दिल्ली ते उत्तराखंडदरम्यान धावणाऱ्या एका ट्रेनने चक्क ३५ किमी उलट दिशेने प्रवास केल्याची घटना समोर आली आहे. ही ट्रेन उत्तराखंडच्या तानकपूर जिल्ह्यापर्यंत जाणार होती. मात्र अचानक आलेल्या एका तांत्रिक बिघाडामुळे ट्रेन उलट दिशेने धावू लागली. अखेर राजधानी दिल्लीपासून ३३० किमी दूर खातिमा येथे ही ट्रेन थांबवण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णगिरी जनशताब्दी एक्स्प्रेसच्या चालकाला ट्रॅकवर प्राणी दिसताच त्याने दुर्घटना टाळण्यासाठी ब्रेक दाबला. पण यानंतर चालकाचा इंजिनावरील ताबा सुटला आणि संपूर्ण ट्रेन उलट दिशेने धावू लागली. यावेळी ट्रेनचा वेगदेखील सामान्य होता.

ट्रेन खातिमा येथे थांबवण्यात आल्यानंतर सर्व प्रवाशांना बसने तानकपूर येथे रवाना करण्यात आलं. दरम्यान तांत्रिक बिघाडाचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.