02 June 2020

News Flash

बाप रे ! ३५ कोटींचं सोन्याचं कमोड गेलं चोरीला

'अमेरिका' या नावाने टॉयलेटला ओळखलं जायचं

इंग्लंडमध्ये १८ कॅरेटच्या सोन्याचे कमोड चोरीला गेलं आहे. चोराने मोठ्या हुशारीने इंग्लंडच्या ब्लेनहेम पॅलेसमधल्या शौचालयातून सोन्याचं कमोड चोरलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी ६६ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. चोरीच्या प्रकरणानंतर तपास सुरू झाल्यानं हे पॅलेसही काही दिवसांसाठी बंद करण्यात आलं आहे.

हे सोन्याचं कमोड इटलीतल्या मॉरिझिओ कॅटेलन यांनी बनवलं होतं. याची किंमत जवळपास पाच मिलियन डॉलर म्हणजे ३५ कोटी रूपये असू शकते. सोन्याचं कमोड चोरीच्या घटनेमुळं ब्लेनहेम पॅलेसलाही मोठं नुकसान झाले. कारण कमोड उखडून काढताना त्या ठिकाणची पाईपलाईन तुटली आणि सगळीकडे पाणी भरलं.

ऑक्सफर्डशायर शहरात असलेलं ब्लेनिम पॅलेस अठराव्या शतकातील ऐतिहासिक स्थळ आहे. गुरुवारपासून या पॅलेसमध्ये प्रदर्शन सुरू झालं होतं. तिथं हे सोन्याचं कमोड प्रदर्शनसाठी ठेवण्यात आलं होतं. शनिवारी स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता चोरांच्या टोळक्यानं सोन्याच्या कमोडवर डल्ला मारला, अशी माहिती थेम्स व्हॅली पोलिसांनी दिली.

या कमोडचा वापर केला जात होता आणि प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्यांना याचा वापर करण्यासही सांगितलं जात होतं. ब्लेनहेम पॅलेसकडून ट्विटरवरून याबाबत माहिती देण्यात आली आहे.

‘अमेरिका’ या नावाने ओळखलं जाणाऱ्या या टॉयलेटचा सर्वात आधी न्यूयॉर्कमध्ये २०१६ मध्ये प्रदर्शन झालं होते. अमेरिका नावाच्या या टॉयलेटला ब्लेनहेम पॅलेसमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान विस्टंन चर्चिल यांच्या जन्म झालेल्या खोलीजवळ लावण्यात आलं होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 6:25 am

Web Title: united kingdom 35 crore rupees golden toilet stolen from british palace famous as america nck 90
Next Stories
1 शापित..! एकाच आडनावांची माणसं असलेलं गाव
2 ‘उत्तमम दद्धातत पादम..’; येथे मोठ्या आवाजात पादणाऱ्याला मिळणार बक्षीस
3 मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा होणार लिलाव, तुम्हीही करु शकता खरेदी
Just Now!
X