महिला दिवसाढवळ्याही सुरक्षित नाहीत हे पुन्हा एकदा समोर आलंय. उत्तर प्रदेशमध्ये प्रेमाला नकार दिला म्हणून एका तरूणाने भररस्त्यात तिला मारहाण करायला सुरू केले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना उत्तरप्रदेशमधल्या पिलीभीत इथली असल्याचे समजत आहे. या तरूणाने मुलीला प्रेमाची कबुली दिली परंतु तिने त्याला साफ नकार दिला. तेव्हा राग अनावर झालेल्या या तरूणाने रस्त्यातच तिला मारायला सुरूवात केली. या तरूणीसोबत आणखी एक मुलगी देखील होती तिने मध्ये पडून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला पण तिचे सारे प्रयत्न व्यर्थ ठरले. या मुलाने अनेकदा तिला मारहाण केली. या संपूर्ण प्रकरणानंतर पीडित तरूणीने पोलिसात तक्रार केली आहे. पोलीस आता गुन्हेगाराचा शोध घेत आहे.
एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार हा तरूण तिला अनेक दिवसांपासून त्रास देत होता. तिने नकार दिल्यानंतर राग अनावर झाल्याने त्याने तिला मारहाण केली. हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एकीकडे योगी सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी अँटी रोमिओ स्कॉड तयार केलाय, पण जर खरंच महिलांच्या सुरक्षेसाठी अँटी रोमिओ स्कॉड असेल तर दिवसा ढवळ्या अत्याचार होत असताना हे लोक कुठे होते असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
#CCTVVisuals: Youth assaults girl in broad daylight in UP's Pilibhit, after she allegedly rejected his love proposal; police registers case pic.twitter.com/uIamcAovuN
— ANI UP (@ANINewsUP) June 16, 2017
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 16, 2017 4:53 pm