अमेरिकेतील टेक्सासमध्ये राहणारे गॉर्डन हार्टमन हे सहकुटुंब फिरायला गेले… त्यांची १२ वर्षाची ऑटिझमग्रस्त मुलगी मॉर्गनही त्यांच्यासोबत होती… पाण्यात खेळणाऱ्या लहान मुलांना बघून मॉर्गनही तिथे गेली… पण मॉर्गनला बघून सर्व मुलांनी तिथून काढता पाय घेतला… मुलीला आलेला हा कटू अनुभव जॉर्डन यांच्या जिव्हारी लागला… ही गोष्ट त्यांच्या लक्षात राहिली आणि आपल्या मुलीसाठी या पित्याने थेट थीम पार्कच बांधलं.

गॉर्डन हार्टमन आणि मॅगी या दाम्पत्याला ऑटिझमग्रस्त मुलगी आहे. पण ऑटिझमग्रस्त मुलीला घेऊन त्यांना फिरायला जाता येत नव्हते. त्यांनी अन्य पालकांशीही यावर चर्चा केली. पण असे कोणतेही ठिकाण अस्तित्वात नाही हे त्यांच्या लक्षात आले. २००७ मध्ये हार्टमन यांनी विशेष मुलांसाठी थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी स्वतःची बांधकाम कंपनी विकली आणि ‘गॉर्डन हार्टमन फॅमिली फाऊंडेशन’ची स्थापना केली. ही एक समाजसेवी संस्था असून गतिमंद, दिव्यांग तसेच ऑटिझमग्रस्त मुलांसाठी ही संस्था काम करते. या संस्थेच्या माध्यमातून गॉर्डन यांनी थीम पार्क बांधलं. थीम पार्कमध्ये काय सुविधा द्याव्या लागतील यासाठी त्यांनी डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ आणि पालकांचे मत जाणून घेतले. शेवटी टेक्सासमधील २५ एकरच्या विस्तीर्ण जागेवर हे पार्क बांधण्यात आले. ‘मॉर्गन वंडरलँड’ यानावाने ही थीम पार्क सुरु करण्यात आले आहे. या थीम पार्कमध्ये विविध खेळ आणि राईड्सचा समावेश आहे. यावर्षी वॉटर पार्कही सुरु करण्यात आले आहे. माझ्या मुलीला बऱ्याच सुविधा मिळाल्या, पण प्रत्येकाला अशा सुविधा मिळतीलच याची शाश्वती नाही, म्हणून आम्ही काही अटींवर विशेष मुलांना थीम पार्कमध्ये मोफत प्रवेश देतो. यातून नुकसान होते हे खरे असले तरी यासाठी आम्ही विविध कंपन्यांमध्ये आर्थिक मदतही घेत असतो असे हार्टमन यांनी ‘बीबीसी’ला सांगितले.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले
randeep surjewala made controversial remarks on hema malini
हेमा मालिनी यांच्याबाबत रणदीप सुरजेवालांचं वादग्रस्त वक्तव्य, कंगनाची तिखट शब्दांत प्रतिक्रिया, “द्वेष आणि तिरस्कार..”
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

अमेरिकाच नव्हे तर जगभरातील मंडळी या थीम पार्कमध्ये येतात. ‘दोन दिवसांपूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे आला, थीम पार्कचे कौतुक करताना त्याने माझा हातच धरला’ असे हार्टमन यांनी सांगितले. त्याच्या डोळ्यातील आनंद मी विसरु शकत नाही असे त्यांनी नमूद केले. या थीम पार्कची किंमत सुमारे ५१ मिलियन डॉलर्स असल्याचे समजते.