26 February 2021

News Flash

भटजी बुवांचा स्वॅग! “दम असेल नात्यात तर लग्न करा दणक्यात, तेही एक रुपयात”

हे भटजी बुवा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत

१४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन डे. या दिवसाचे महत्व काही वेगळे सांगायला नको. हा दिवस संपूर्ण जगात असंख्य कपल अतिशय जोरात साजरा करतात. अर्थात या दिवसाला भेटलेल्या प्रेमी जोडप्यांपैकी किती जोडपी लग्न करतात हे कुणीच सांगू शकत नाही. कदाचित हाच विचार करुन एका भटजी बुवांनी व्हॅलेंटाईन डेला एक वेगळाच स्वॅग दाखवला आहे.

आज सांगली शहरात गर्दीच्या ठिकाणी एक भटजी बुवा त्यांच्या पारंपरिक वेशात हातामध्ये बोर्ड घेऊन उभे दिसले. अतिशय मजेदार असे भटजी बुवा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करणाऱ्या कपल्सला डायरेक्ट मेसेज देत होते की ‘दम असेल नात्यात तर लग्न करा दणक्यात, तेही एक रुपयात..’ मजा म्हणजे त्यांनी एक नंबर सुद्धा बोर्ड वर लिहिला होता.

आता अशी कोणीतरी व्यक्ति शहराच्या मधोमध बोर्ड घेऊन उभी राहिली तर दंगा तर होणारच ना आणि तेच घडले. सगळ्यांना हे आधुनिक भटजी बुवा भलतेच आवडले. अनेक कपल्सने तेथे थांबून या भटजी बुवांबरोबर सेल्फीसुद्धा काढले. तर अनेक मुलींनी त्यांच्या प्रियकराला हा मेसेज दाखवत चिडवले सुद्धा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 5:18 pm

Web Title: valentines day special bhatji banner viral on social media avb 95
Next Stories
1 नशिबवान! आठ वर्षाच्या कुत्र्याच्या नावावर मालकाने ठेवले ५० लाख डॉलर्स
2 Video : कचरा फेकायला खिडकीतून खाली वाकला, पण थेट कचऱ्याच्या गाडीत जाऊन पडला
3 एका लग्नाची आणि फोटोची गोष्ट… लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरदेवाला वर्क फ्रॉम होम?
Just Now!
X