News Flash

Viral Video : …अन् अवघ्या काही क्षणांमध्ये दरीत पडला १८० कोटींचा राष्ट्रीय महामार्ग

आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका बाजूला गाड्यांची वाहतूक सुरु असताना दरीच्या बाजूचा रस्त्याचा भाग दरीत पडला, त्यानंतरही दुसऱ्या लेनमधून गाड्यांची वाहतूक सुरु होती

नहारलागून आणि इटानगरला जोडणाऱ्या या रस्त्याचं काम नुकतचं पूर्ण झालं होतं.  या रस्त्याच्या बांधकामासाठी १८० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय.

अरुणाचल प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग ४१५ चा काही भाग दरीत कोसळल्याचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल झालाय. ३१ मे रोजी ही दुर्घटना घडली असली तरी सोशल नेटवर्किंगवर मागील दोन दिवसांपासून हा नव्याने बांधण्यात आलेला रस्ता दरीत कोसळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये अरुणाचल प्रदेशमधील इटानगरमध्ये जोरदार पाऊस पडला. सततच्या पवासामुळे राजधानी इटानगरमधील इंदिरा गांधी पार्कजवळच्या डी सेक्टरमधील डोंगराचा कडा कोसळला. त्यामुळेच या डोंगरावर बांधण्यात आलेला राष्ट्रीय महामार्गाचा एका बाजूला भाग पाहता पाहता काही क्षणांमध्ये दरीत कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

नक्की पाहा >> Viral Video: हा हळदी समारंभ पाहून ‘हेच पहायचं बाकी होतं’ अशीच तुमची पहिली प्रतिक्रिया असेल

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डोंगरकड्यावर बांधण्यात आलेल्या या राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूने गाड्यांची वाहतूक सुरु असतानाच दरीकडच्या बाजूचा भाग कोसळल्याचं दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये व्हिडीओ शूट करणारी व्यक्ती या रस्त्याचा काही भाग दरीत कोसळल्यानंतर “भाई तूट गया… देईये…” असं म्हणताना ऐकू येत आहे.

नहारलागून आणि इटानगरला जोडणाऱ्या या रस्त्याचं काम नुकतचं पूर्ण झालं होतं.  या रस्त्याच्या बांधकामासाठी १८० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. हा रस्ता दोन दिवसाच्या पावसामध्ये अशाप्रकारे खचल्याने रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या बांधकामाच्या दर्जाची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. सततच्या पावसामुळे अरुणाचलमधील इतर काही भागांमध्येही जमीन खचल्याच्या घटना घडल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 4:42 pm

Web Title: viral video itanagar newly constructed national highway collapsed on may 31 scsg 91
Next Stories
1 Coronavirus: ‘लस घ्या मोफत बिर्याणी मिळवा’ योजनेला तुफान प्रतिसाद; ‘लस’वंतांना फ्रीज, दुचाकी जिंकण्याचीही संधी
2 Video: करोनावर मात करण्यासाठी दोन पऱ्या आल्याचं ऐकून शेकडो गावकऱ्यांनी केली गर्दी
3 “तुझ्या बापाला,” नेटकऱ्याचा बाप काढल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर वादात
Just Now!
X