विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यात निर्भेळ यश संपादन केलं. सर्वात प्रथम टी-२०, त्यानंतर वन-डे आणि अखेरीस कसोटी मालिकेतही बाजी मारत भारताने विंडीजला व्हाईटवॉश दिला. मात्र या कामगिरीनंतरही विराट कोहलीला ट्रोल व्हावं लागलं आहे. याला कारण ठरलंय, विराटने ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेला ‘शर्टलेस’ फोटो.

As long as we look within, we won’t need to seek anything outside, अशी कॅप्शन देत विराटने ट्विटरवर आपला फोटो पोस्ट केला.

नेटकऱ्यांनी मात्र या फोटोवरुन विराटला चांगलच ट्रोल केलं आहे.