03 August 2020

News Flash

ह्रदयाचा ठोका चुकवणारी घटना! इमारतीला आग लागल्यानंतर मुलांनी घेतल्या ४० फूटावरून उड्या

काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

ह्रदयाचा ठोका चुकवणारी घटना फ्रान्समध्ये घडली आहे. इमारतीला आग लागल्यानंतर दोन मुलांनी तिसऱ्या मजल्याहून अंदाजे ४० फूटावरुन उडी मारली. सुदैवाने दोघांचे प्राण वाचले आहेत. फ्रान्समधील या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. डेली मेल या वृत्तपत्रानं याबाबतची माहिती दिली आहे.

ही धक्कादायक घटना मंगळवारी फ्रान्समधील ग्रेनोबल शहरात घडली. अचानक येथील इमारतीला आग लागली. त्यानंतर जीव वाचवण्यासाठी तीन आणि दहा वर्षांच्या मुलांनी तिसऱ्या मजल्याहून खाली उडी टाकली. सुदैवानं या चुमरड्यांना काहीही झाले नाही. खाली असलेल्या बचाव पथकानं या दोघांना अलगद झेललं. या दोघांना कोणतीही दुखापत झाली नाही . मात्र धुरामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

डेली मेलच्या वृत्तानुसार, या चिमुकल्यांचे आई-बाबा त्यांना घरात लॉक करुन बाजारात गेले होते. त्याचवेळी अचानक तिसऱ्या मजल्याला आग लागली. आगीचे डोंब उडत होते. मुलं घाबरली होती. इमारतीच्या खाली शेजारी आणि बचाव पथक पोहचलं होतं. मुलांनी खाली उडी मारली त्यांना अलगद झेललं आणि जीव वाचवला.

सीटीव्ही न्यूजनुसार, या सर्व घटनेचा व्हिडीओ शेजाऱ्यांनी आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला. या व्हिडीओमध्ये इमारतीमध्ये आग लागलेली दिसत आहे, तर इमारतीखाली लोकं जमा झाले आहेत. यातच खिडकीच्या बाहेर लटकताना दोन मुलं दिसत आहेत. घराचा दरवाजा लॉक असल्यामुळे ते घराबाहेर पडू शकत नव्हते. प्रसंगावधान दाखवत आधी मोठ्या भावाने लहान भावाला बाहेर काढले. त्याला खाली उभे असलेल्या लोकांच्या हातत फेकलं. त्यानंतर स्वत: खाली उडी मारली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 11:43 am

Web Title: watch 2 boys jump from burning in france nck 90
Next Stories
1 जगभरात करोनाचा फैलाव होण्यामागे गेट्स यांचा हात असल्याचा दावा करणाऱ्यांना बिल गेट्स यांचं उत्तर, म्हणाले…
2 २१ वर्षानंतर सापडलेल्या पोकीमॉन कार्डसाठी लागली इतक्या लाखांची बोली; तरुण झाला मालामाल
3 फोटोसाठी सोंडेवर बसलेल्या महिलेला हत्तीनं अशी शिकवली अद्दल, व्हिडीओ झाला व्हायरल
Just Now!
X