13 December 2019

News Flash

Video : जेव्हा अमेरिकेची टेनिसपटू स्वतःच्या लग्नात बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकते

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

विम्बल्डन २०१९ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारणारी अमेरिकेची टेनिसपटू एलिसन रिस्क विवाहबंधनात अडकली आहे. मूळ भारतीय वंशाचा असलेल्या स्टिफन अमृतराज आणि एलिसन यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. स्टिफन हा माजी खेळाडू आनंद अमृतराज यांचा मुलगा असून त्याने याआधी भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या विवाहसोहळ्यात एलिसनने चक्क बॉलिवूडच्या एका गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

एलिसनने नच दे ने सारे या गाण्यावर डान्स करत, आपल्या भारतीय चाहत्यांनाकडून प्रतिक्रीया मागवल्या आहेत. तिच्या या व्हिडीओवर भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झानेही आपली प्रतिक्रीया देत एलिसनचं कौतुक केलं आहे.

एलिसन आणि स्टिफन अमृतराज हे गेली अनेक वर्ष एकत्र आहेत. जागतिक क्रमवारीत एलिसन ३७ व्या स्थानावर आहे. विम्बल्डन २०१९ स्पर्धेत एलिसनने एश्ली बार्टीला हरवत उपांत्य फेरीत धडक मारली होती, मात्र उपांत्य फेरीत तिला सेरेना विल्यम्सकडून पराभव स्विकारावा लागला होता.

First Published on July 22, 2019 5:55 pm

Web Title: watch american tennis player alison riske dedicates bollywood dance number to indian followers psd 91
Just Now!
X