News Flash

कपिल देव यांनी टक्कल केल्याचं पाहून अनुपम खेर खूश, दिली मजेशीर प्रतिक्रिया….

कपिल देव यांचा नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

कपिल देव यांनी टक्कल केल्याचं पाहून अनुपम खेर खूश, दिली मजेशीर प्रतिक्रिया….

करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाउन असल्याने केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू आहेत. त्यामुळे दाढी-केस कटिंगची दुकानेही बंद आहे. याचा फटका सामान्यांसह दिग्गजांनाही बसतोय. परिणामी भारताचा माजी क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर, सध्याचा कर्णधार विराट कोहली यांनी घरीच केस कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर आता टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांचा नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

कपिल देव यांनी काही दिवसांपूर्वी टक्कल केलेला आणि फ्रेंच कट दाढी असलेला नवीन लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासून त्यांचा मेकओव्हर केलेला हा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असून नेटकरी त्यावर विविध प्रतिक्रिया देतायेत. काहींनी त्यांच्या या लूकची तूलना वेस्ट इंजिडचे माजी महान खेळाडू विव रिचर्ड्स यांच्याशी केली आहे. तर काहींनी त्यांची कटप्पा, रजनीकांत, थानोस, यांच्याशी तुलना केली आहे. अभिनेते अनुपम खेर यांनीही कपिल देव यांच्या फोटोवर मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

“माझे मित्र कपिल देव यांनीही टक्कल केलंय…फॅशन म्हणून याला ‘शेव्ड’ म्हणतात…या जगात केवळ टकले आणि भविष्यातील टकले अशा दोन प्रकारचेच पुरुष असल्याचं मी नेहमी म्हणत आलोय..गंजों की महफिल में आपका ‘बालों रहित’ स्वागत है”, अशा आशयाचं ट्विट अनुपम खेर यांनी केलं आहे. आपल्या या ट्विटमध्ये अनुपम खेर यांनी कपिल देव यानाही टॅग केलंय.

Next Stories
1 Bravo Mukesh! फेसबुक-जिओ कराराचं आनंद महिंद्रांनी केलं कौतुक
2 Coronavirus : ‘त्या’ मराठमोळ्या पंतप्रधानांनी केला नरेंद्र मोदींना फोन, मानले आभार
3 Video : २०० जणांना करोनापासून वाचवणाऱ्या भारतीय डॉक्टराचा अमेरिकेत अनोख्या पद्धतीनं सन्मान
Just Now!
X