केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली राजधानी दिल्लीच्याच्या सीमेवर गेल्या ११ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. शेतकरी नेते आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम आहेत. शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्या-मंगळवारच्या ‘भारत बंद’ला काँग्रेससह विरोधकांनी रविवारी पाठिंबा जाहीर केला. प्रत्यक्षात लढाईबरोबरच सोशल नेटवर्किंगवरही या शेतकरी आंदोलनावरुन दोन गट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून या आंदोलनासंदर्भातील वेगवेगळे हॅशटॅग चर्चेत आहेत. मात्र आज ट्विटरवर #गीता_भाटी_का_सैंडल_वापस_करो हा हॅशटॅग ट्रेण्ड होताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा हॅशटॅग वापरुन १४ हजारांहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.
नक्की काय आहे हे प्रकरण

दिल्लीच्या सीमांजवळ हरयाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकरी आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडामध्ये काही महिला शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाल्या आहेत. याच महिला शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी काही पत्रकार पोहचले होते. या पत्रकारांशी संवाद साधताना या महिला आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्या किसान राष्ट्रीय संघाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा गीता भाटी यांनी माझ्या सॅण्डल चोरीला गेल्याची तक्रार पत्रकारांना ऐकवली. “मी गीता भाटी. किसान राष्ट्रीय संघाच्या महिला मोर्चाची अध्यक्षा आहे. पोलीस प्रशासन आणि सरकारने कट करुन माझ्या सॅण्डल चोरल्या. मी आंदोलनामध्ये या पुढे जाऊन लढू नये यासाठी हा कट रचण्यात आला. मात्र मी अनवाणी ही लढाई लढणार आहे. आता मला सॅण्डल कोण आणून देणार. या सरकारने माझ्या सॅण्डल परत कराव्यात,” अशी मागणी गीता यांनी टीव्ही पत्रकारांसमोर बोलताना केली. गीता यांच्या या मागणीचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे.

गीता यांनी केलेल्या मागणीवरुन नेटकरीही सैराट झाले असून आधीच शेतकरी प्रश्न सरकारसमोर असतानाच गीता भाटी यांची सॅण्डल चोरल्याचा आरोपही सरकारवर लावला जात असल्याची फिरकी अनेकांनी घेतली आहे. तर काहींनी व्हायरल व्हिडीओमधील गीता यांनी केलेले दावे पाहून हे प्रकरण सरकारच्या अंगाशी येणार अशी कोपरखळी लगावली आहे. सोशल नेटवर्किंगवर या व्हिडीओवरुन मिम्सचा पाऊस पडलाय. अनेकांनी गीता यांनी केलेली मागणी योग्य असल्याचे म्हणत, #गीता_भाटी_का_सैंडल_वापस_करो हा हॅशटॅग वापरुन ट्विट केलं आहे. काही तासांमध्ये १४ हजारांहून अधिक ट्विट या हॅशटॅगवर पडले आहेत.

काहींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केलीय तर काहींनी हे उत्तर प्रदेश सरकारचे आणि पर्यायाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अपयश असल्याची मजेदार ट्विट केली आहेत. काहींनी थेट बुर्ज खलिफावर हा हॅशटॅग दिसत असल्याचं म्हटलं आहे तर काहींनी आता तरी मोदींनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात खुलासा करावा असं म्हणत ट्विट केलं आहे. पाहुयात असेच काही मजेदार ट्विट…

१) केंद्रीय गृहमंत्रालयाने यात लक्ष घालावं

२) बंद करा हा ट्रेण्ड

३) थेट दुबईपर्यंत पोहचला आवाज

४) हे लागले कामाला

५) कोणी ट्रेण्ड सुरु केला?

६) सॅण्डल म्हणत असतील

७) सीबीआय तपास करा

८) आंदोलनही सुरु झालं म्हणे

९) ज्याने कोणी…

१०) मला तर वाटलं

११) योगींना हे समजलं तेव्हा

१२) हा राजकीय डाव

१३) गीता यांना वाढता पाठिंबा पाहून

१४) मोदींचा राजीनामा म्हणे

१५) पत्रकार परिषद घेण्याची तयारी

शेतकरी आंदोलनासंदर्भात यापूर्वीही अनेक हॅशटॅग ट्रेण्ड झालेत मात्र अशापद्धतीने मजेदार हॅशटॅग ट्रेण्ड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.