जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वानं त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. महिलांच्या हक्कांचं रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. हे महत्त्व अधोरेखित करताना गुगलनंही खास डुडल तयार करून स्त्री शक्तीला सलाम केला आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त गुगलनं विषेश डुडल तयार केलं आहे. या डुडलमध्ये जगभरातील चौदा प्रभावी महिलांच्या विचारांचा समावेश आहे. डुडलच्या प्रत्येक स्लाइडवर जगभरातील विवध महिलांचे विचार मांडण्यात आले आहे. हे विचार प्रत्येक महिलांना प्रेरणा देणारे असेच आहेत.
भारत, जपान, अमेरिका, मॅक्सिको, जर्मनी, ब्राझील, रशिया मधल्या विविध क्षेत्रात आपल्या कामानं ठसा उमटवणाऱ्या महिलांचा समावेश डुडलमध्ये करण्यात आल्या आहे.
लेखक, कवयत्री, अंतराळवीर, डॉक्टर, खेळाडू अशा विविध महिलांचे प्रभावी विचार अतिशय नेमकेपणानं डुडलमधून मांडण्यात आले आहेत.
First Published on March 8, 2019 10:01 am