News Flash

बापरे ! एका नंबर प्लेटची किंमत १३२ कोटी

१३२ कोटीमध्ये नंबरप्लेटच काय कित्येक आलिशान गाड्या विकत घेता येतील. ही प्लेट आता कोण विकत घेतोय हे पाहण्यासारखं ठरेल.

एखाद्यानं ही नंबरप्लेट विकत घेतली तर सर्वाधिक किंमतीत विकली गेलेली ही पहिली नंबर प्लेट असेल.

एका नंबरप्लेटसाठी कोणी १३२ कोटी मोजल्याचं ऐकलंय का? एवढ्या किंमतीत नंबरप्लेटसहित कित्येक आलिशान गाड्या विकत घेता येतील नाही का? पण ब्रिटनमधल्या अफझल खान नावाच्या व्यक्तीनं आपल्या आलिशान गाडीवरील नंबरप्लेट चक्क १३२ कोटी रुपयांना विक्रीसाठी ठेवली आहे. या प्लेटची मूळ किंमत जवळपास ११० कोटी आहे त्यावर कर असल्यानं एकूण १३२ कोटी रुपये मोजून संग्राहकाला ती विकत घेता येणार आहे. पिवळ्या रंगाच्या पट्टीवर ‘F1’ असं लिहिलेल्या या प्लेटची जर विक्री झालीच तर जगातील सर्वाधिक किंमतीत विकली गेलेली ही नंबरप्लेट ठरेल.

वाचा : अंतराळातल्या पहिल्या वहिल्या आलिशान हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च माहितीये?

‘फॉर्म्युला १’ लिहिलेली ही कारची नंबरप्लेट काही वर्षांपूर्वी अफझल यांनी १०. ५२ कोटींना विकत घेतली होती. त्यांच्या आलिशान बुगाटी कारवर ही नेमप्लेट होती. युकेमधील अनेकांकडे अशा काही परवाना असलेल्या नंबरप्लेट्स आहेत ज्या ते लिलावात विकू शकतात. त्यानं UK’s Regtransfers मार्फत ही नंबरप्लेट विक्रीसाठी ठेवली आहे. ही युकेमधील सर्वात मोठी आणि अधिकृत नंबरप्लेट्सची विक्री करणारी वेबसाईट आहे. अनेक सेलिब्रिटींनी आपल्या आलिशान गाड्यांच्या नंबरप्लेट्स इथून विकत घेतल्या आहेत.

वाचा : ….तर ते ७० भटके कुत्रे कोट्यधीश होतील

याआधी सोन्याच्या किंवा हिरेजडीत नंबरप्लेटवर कोट्यवधीची बोली लागली होती. पण १३२ कोटींची किंमत असलेली ही कदाचित पहिलीच नंबर प्लेट असेल. जर एखाद्यानं ही नंबरप्लेट विकत घेतली तर सर्वाधिक किंमतीत विकली गेलेली ही पहिली नंबर प्लेट असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2018 6:00 pm

Web Title: worlds costliest car number plate
Next Stories
1 करायला गेलं एक झालं भलतंच, चुकून दुसरीच इमारत पाडली
2 अंतराळातल्या पहिल्या वहिल्या आलिशान हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च माहितीये?
3 मुलाच्या अॅडमिशनसाठी ‘गरीब’ बापाच्या ‘फिल्मी’ उचापती, दिल्लीत पोलिसांनी घातल्या बेड्या
Just Now!
X