कोट्यवधी किंमतीची हिरे, सोने-चांदींनी मढवलेली जगातील सर्वात महागडी व्होडकाची बाटली चोरीला गेली आहे. डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमधील एका बारमध्ये ही महागडी बाटली प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती. पण, नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच ही बाटली चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. व्होडकाच्या बाटलीची किंमत १.१ मिलियन युरो म्हणजे जवळपास साडेआठ कोटी रुपये इतकी आहे.

व्हॉट्स अॅपचा अनोखा रेकॉर्ड, एकाच दिवशी पाठवण्यात आले ७,५०० कोटी शुभेच्छांचे मेसेज

ही बाटली तयार करण्यासाठी तीन किलो सोनं आणि तीन किलो चांदीचा वापर करण्यात आला होता. ‘माँट कार्लो कार रॅली’साठी तयार करण्यात आलेला चामड्याच्या बॅच या बाटलीच्या मध्यभागी होता. अत्यंत वैशिष्ट्पूर्ण पद्धतीनं ही बाटली घडवली होती, त्यामुळे ही सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरली. विशेष म्हणजे या बाटलीच्या कॅपमध्ये हिरे मढवले होते. १९१२ च्या खास चामड्याचा बॅच या बाटलीला लावण्यात आला होता. जगभरात गाजलेल्या ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ या टीव्ही सिरिजमध्येही ही बाटली दाखवण्यात आली होती. कोपनहेगनमधील ‘कॅफे 33’ या बारमध्ये ही बाटली गेल्या काही महिन्यांपासून ठेवण्यात आली होती. रशियातील महागड्या आणि अलिशान कार आणि व्होडका तयार करणाऱ्या ‘डार्ट्झ फॅक्टरी’तून बाटली आणली होती.

…आणि तिने पायाने काढले सर्वात मोठे चित्र

रात्री बार बंद झाल्यानंतर चोर बारमध्ये शिरला आणि त्यानी ही बाटली चोरली असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. सध्या पोलीस या चोराचा शोध घेत आहेत.